Mumbai News, 21 Mar : संपूर्ण महाराष्ट्राला हादरवरून सोडणाऱ्या सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्याकांडात मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचा सहकारी असलेल्या वाल्मिक कराडला मुख्य आरोपी करण्यात आलं आहे. कराडला आरोपी करताच राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) मंत्री धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.
मुंडेंनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या आमदारकी रद्द करावी आणि त्यांना देखील या हत्या प्रकरणी सहआरोपी करावं, अशी मागणी जोर धरू लागली आहे. अशातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत धनंजय मुंडेंबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
मुंडेंविरोधात कुणी पुरावे दिले तर त्यांच्यावर कारवाई करण्याची आमची तयारी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. फडणवीसांच्या या वक्तव्यामुळे आता मुंडेविरोधात पुरावा मिळाला तर खरंच त्यांची चौकशी केली जाणार का? आणि त्यांच्यावर कारवाई करणार का? याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणावर बोलताना फडणवीस यांनी पोलिसांनी अत्यंत प्रोफेशनली तपास केल्याचं सांगितलं. शिवाय या संपूर्ण प्रकरणात संपूर्ण चार्जशिटमध्ये धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा कुठेही थेट संबंध आलेला नाही तरी देखील त्यांचा राजीनामा घेतला. त्याचं मुख्य कारण म्हणजे, संतोष देशमुख हत्या प्रकरणांमध्ये ज्याला मुख्य आरोपी असलेला वाल्मिक कराड हा मुंडे यांचा राईट हॅन्ड असून वर्षानुवर्ष त्याने नधनंजय मुंडेंचं राजकारण सांभाळलं आहे.
त्यामुळे राज्यातील जनतेची अपेक्षा होती की, नेत्यांच्या जवळचे लोक इतक्या क्रूर पद्धतीचं काम करत असतील तर नेत्यांनी पश्चाताप म्हणून किंवा नैतिकतेच्या आधारावर तरी अशा प्रकारचा निर्णय घेतला पाहिजे, म्हणून आम्ही त्यांचा राजीनामा घेतल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलं.
शिवाय या दोन गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत ते म्हणजे चार्चशिटमध्ये धनंजय मुंडेंचं नाव नाही आणि वाल्मिक कराड हाच मुख्य आरोपी आहे. तसंच कोणाच्या जवळचा व्यक्ती आहे म्हणून त्याची चौकशी करता येत नाही. त्या संपूर्ण घटनेत जर त्या व्यक्तिविरोधात काही पुरावा असेल तर त्याची चौकशी करता येते.
अशा प्रकारचा पुरावा काही आढळला का कोणी दिला का? रोज येऊन कोणीतरी टीव्हीवर बोलायचं आणि त्यावर पोलिसांनी तपास करायचा असं चालत नाही. मात्र, धनंजय मुंडे यांच्याविरोधात आताही कोणी आजही पुरावा आणून दिला त्यांची चौकशी करण्याची आणि त्यांच्यावर कारवाईची करण्याची आमची तयारी असल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. तसंच पुरावे नसताना उगीचच हवेत तीर मारण्यात काहीही अर्थ नसल्याचंही ते यावेळी म्हणाले.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.