Bjp State President Chandrashekar Bawankule News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Chandrashekar Bawankule On Reservation : या, भेटा पण राजकारण करू नका ; बावनकुळेंचा राजकीय नेत्यांना सल्ला..

Jagdish Pansare

Aurangabad Political News : अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषणकर्त्यांवर काल पोलिसांकडून लाठीहल्ला झाला. यावेळी मोठ्या प्रमाणात धावपळ, गोंधळ, दगडफेक झाली. (Maratha Reservation) यामध्ये पोलिसांनी केलेल्या लाठी हल्यात अनेक आंदोलक जखमी झाले. तर आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत पोलिस कर्मचारीही गंभीर जखमी झाले. या घटनेचे आज दुसऱ्या दिवशी राज्यभरात पडसाद उमटत आहे.

अंतरवाली सराटी येथे उपोषणकर्ते व जखमी आंदोलकांना भेटण्यासाठी विविध राजकीय पक्षांचे नेते येत आहेत. (Maratha Reservation) यावरून आता सत्ताधारी आणि विरोधक यांच्या आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekar Bawankule) यांनी आंतरवाली सराटी येथे भेट देण्यासाठी येणाऱ्या विरोधी पक्षाच्या नेत्यांना या, भेटा पण घटनेचे राजकारण करू नका असा सल्ला दिला आहे.

देवेंद्र फडणवीस पाच वर्षे मुख्यमंत्री असताना मराठा समाजाचे साठ मोर्चे निघाले. त्यावेळी एकाही मोर्चात शांतता भंग झाली नाही, की सार्वजनिक संपत्तीचे नुकसान झाले नाही. (BJP) अगदी शातंतेत हे मोर्चे निघाले होते, कुठेही गालबोट लागले नाही. साठ मोर्चांना गालबोट लागले नाही, मात्र काल अशा प्रकारे आंदोलनाला गालबोट लागले. मराठा समाजास संयमी आहे, मराठा समाजाने नेहमीच्या राज्याला प्रगतीकडे नेले.

त्यामुळे काल झालेल्या घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे. या घटनेवरून राजकारण कुणीही करू नये. जे आंदोलनकर्त्यांना, जखमींना भेटायला येत आहेत, त्यांनी आवश्य यावे, पण राजकारण करू नये, असा सल्ला देखील बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलतांना दिला. जे या मुद्याचे राजकारण करू पाहत आहेत, त्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे. जेव्हा आपल्या हातात सत्ता होती, जनतेने तुमच्या पेनमध्ये सही करायची ताकद दिली होती तेव्हा तुम्ही काय केले? याचे आधी आत्मपरीक्षण करावे आणि नंतर बोलले पाहिजे. जेव्हा मला अधिकार मिळाले तेव्हा मी त्या अधिकाराचा वापर केला होता का? याचा विचार करावा. ४५ वर्षे यांचे सरकार होते, देवेंद्रजींच्या काळात मराठा आरक्षणाचा निर्णय झाला.

सुप्रीम कोर्टात झाला, हायकोर्टात झाला विधिमंडळात झाला. मात्र नतदृष्ट उद्धव ठाकरेंच्या सरकारने सुप्रीम कोर्टात योग्य पद्धतीने बाजू मांडली नाही. तेव्हापासून मराठा आरक्षणाचा वाद निर्माण झाला. तेच सध्या मराठा समाजावर आणि त्यांच्या आरक्षणावर राजकारण करत आहेत, असा आरोपही बावनकुळे यांनी केला. तुम्ही या भेटा पण राजकारण करू नका. शरद पवारांनी तिथे जाऊन भेटलच पाहिजे. आत्ताच गालबोट कसे काय लागले? राज्यातील कुठल्याही संपत्तीला नुकसान होईल असं मराठी समाज कधीच वागत नाही. त्यामुळे या घटनेची उच्चस्तरीय चौकशी झालीच पाहिजे, असेही बावनकुळे यांनी म्हटले आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT