Maratha Reservation Protest News
Maratha Reservation Protest News Sarkarnama

Maratha Reservation News : जालन्यात आंदोलनाला हिंसक वळण, दगडफेक-जाळपोळ; पोलिसांकडून हवेत गोळीबार..

Marathwada News : जमाव अनियंत्रित होऊन त्यांनी खाजगी वाहनांची जाळपोळ सुरू केली.
Published on

Jalna News : अंतरवाली सराटी येथील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषणकर्त्यांवर काल पोलिसांकडून लाठी हल्ला करण्यात आला. (Maratha Reservation) या घटनेचे तीव्र पडसाद राज्यात ठिकठिकाणी आज उठत आहे. जालना येथे या लाठी हल्याच्याविरोधात रस्त्यावर उतरून करण्यात आलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले.

Maratha Reservation Protest News
Maratha Reservation News : शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सरकार चालवता, मग आरक्षण का देत नाही ?

अचानक दगडफेक सुरू झाल्याने पोलिसांनी आंदोलकांना रोखण्यासाठी हवेत गोळीबार केला. यामुळे जालन्यातील वातावरण सध्या चांगलेच तापले आहे. (Jalna) जालना शहरात रास्ता रोको आंदोलन दरम्यान आंदोलकांनी तुफान दगडफेक केली. त्यामुळे पोलिसांनी हवेत गोळीबार करत, अश्रूधुराच्या नळकांड्याचा मारा केला.

जालना शहरातील अंबड चौफुली येथे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. (Maratha Reservation) मात्र, या आंदोलनात शहरासह परिसरातील समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले. हा जमाव अनियंत्रित होऊन त्यांनी (Marathwada) खाजगी वाहनांची जाळपोळ सुरू केली.

यात अंबड रोडवरील उभा असलेला एक ट्रक जमावाने जाळला. शिवाय काही खासगी वाहनांची तोडफोड केली. त्यानंतर आक्रमक झालेल्या जमावाने पोलिसांच्या दिशेने तुफान दगडफेक सुरू केली. त्यामुळे रस्त्यावर दगड, विटांचा खच पडला होता. आक्रमक झालेल्या जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार करत अश्रूधुराचा मारा केला. त्यानंतर आंदोलक पळाले.

मात्र, आंदोलनातील तरुणांकडून पोलिसांवर दगडफेक सुरु होती. सध्या शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून तणावपूर्ण शांतता आहे. आंदोलनाचे वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना काही आंदोलकांनी शिवीगाळ करत मारहाण केली. शिवाय जाळपोळीचे छायाचित्रे, चलचित्र घेण्यापासून रोखले.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com