राम काळगे
Maharashtra Assembly Election 2024 : निलंगा विधानसभा मतदारसंघ हा सुसंस्कृत मतदारसंघ आहे. परंतु काही बाहेरची मंडळी चांगल्या वातावरणात मिठाचा खडा टाकून ते दूषित करण्याचा प्रयत्न करत आहेत. शक्यतो मी बोलत नाही परंतु निलंग्याच्या अस्मितेला ठेच पोहचत असेल तर आम्ही सहन करणार नाही. खबरदार निलंगा कडे वाकड्या नजरेने पाहाल तर, असा इशारा माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकर यांनी अप्रत्यक्षपणे बाभळगाव च्या देशमुखांना दिला.
निलंग्याची जनता स्वाभिमानी आहे. जिल्ह्यातील काही नेत्यांनी निलंग्याला डिवचण्याचे काम करत अपप्रचार चालवला आहे. जनतेत संभ्रम पसरवला जात आहे. यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. निलंग्याचे मतदार अशा लोकांना जागा दाखवतील, असे सांगून या निवडणुकीत आमदार संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) यांना आशीर्वाद द्या, असे आवाहनही त्यांनी केले. काँग्रेसच्या उमेदवारांचे डिपाॅझीट जप्त करा, असेही त्या म्हणाल्या.
संभाजी पाटील निलंगेकर यांच्या आशिर्वाद सभेत रुपाताई पाटील निलंगेकर यांनी केलेल्या भाषणाची जिल्ह्याच्या राजकारणात चर्चा होत आहे. याच मेळाव्यात संभाजी पाटील निलंगेकर यांनी आम्ही दिवंगत दिलीप भाऊ पाटील निलंगेकर यांचा वारसा घेऊन काम करतोय.
माझ्याकडे आलेल्या प्रत्येक माणसाचे समाधान करण्याचा प्रयत्न मी केला आहे. करोना काळात 24 तास जनतेसाठी समर्पित भावनेने काम केले आहे. त्यामुळे मी आता माझ्या भावासाठी तुमचा आशीर्वाद मागत असल्याचे ते म्हणाले.
आम्ही निलंग्याचाच नाही तर संपूर्ण लातूर जिल्ह्याचा विकास केला आहे, ही चारित्र्यसंपन्न कर्मयोगी डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांची शिकवण आहे. (Latur) तुम्ही काही वाईट शिवराळ बोला, पण आम्ही एकच बोलतो,' हे निलंगा आहे राजा हे निलंगा', असा इशारा अरविंद पाटील निलंगेकर यांनी विरोधकांना दिला. मी संयम आणि समर्पितपणा आपल्याकडून शिकलो आहे.
आतापर्यंत आपण बॅकफूट वर जाऊन काम केले आहे, पण 2024 नंतर फ्रंट फूटवर जाऊन काम करणार, असा विश्वासही त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला. नम्रतेने वागत आम्ही जनतेची सेवा करू. कार्यकर्त्यांनी जिल्हा व मतदारसंघाच्या विकासासाठी पुढील 20 दिवस द्यावेत. तुमचा भाऊ,मित्र,मुलगा म्हणून मी सर्वांसोबत राहून विकासासाठी प्रयत्नशील राहीन,असे आश्वासन त्यांनी उपस्थितांना दिले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.