राम काळगे
Sambhaji Patil Nilangekar News : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते. आत्ता राज्यात महायुतीचे सरकार आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना देशात राज्यावर कोरोना संकट आले होते. या कोरोनाची संकटाची तुलना भाजपचे माजी मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी काँग्रेस सरकारसोबत केली आहे.
निलेंगेकर म्हणाले,'जसे देशावर कोरोनाचे संकट आले होते तसे राज्यावर काँग्रेसचे सरकार म्हणजे एक संकटच होते.'
राज्यातील महायुती सरकारच्या काळात अनेक लोकउपयोगी निर्णय झाल्याने हे सरकार सर्वसामान्याचे सरकार. सर्व घटकांना सोबत घेऊन चालणारे सरकार, अशी प्रतिमा निर्माण झाली आहे. पुन्हा एकदा महायुतीचा झेंडा फडकावण्यासाठी मतदारांनी आशीर्वाद द्यावा, असे आव्हान संभाजीराव पाटील निलंगेकर यानी केले.
निलंगा येथील नव्याने उभारण्यात आलेल्या बसस्थानकाच्या उदघाटन प्रसंगी निलंगेकर बोलत होते.
'निलंगा मतदारसंघातील बसस्थानकाचे काम केवळ काँग्रेसच्या सत्ता काळात रखडले होते. अडीज वर्षांच्या काळात महाविकास आघाडी सरकारने एक खडकूही दिला नाही.परंतु महायुतीच्या काळात शहरातील चारही बाजूने अंतर्गत रस्ते होणार आहेत.पाणीपुरवठा योजना वैशिष्ट्येपूर्ण योजना जिल्हा नियोजन योजना असा भरघोस निधी मिळाला आहे.', असे निलंगेकर यांनी सांगितले.
'सर्व घटकांना महायुती सरकारच्या काळात निधी मिळाला असून लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांना मोफत विजबील, मुलींना मोफत उच्च शिक्षण,असे अनेक निर्णयाबरोबर महाविकास आघाडी सरकारने एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांचा प्रश्न सहा महिन्यात मिटला नाही. पंरतु स्वता: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे खाते असल्याने दीड दिवसांत हा प्रश्न मिटवला.
निलंगा शहरातील उपजिल्हा रूग्णालयात व सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय व नवीन विश्रामगृहाचे आणि कर्मचारी निवासस्थानाचे उदघाटन माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.