Jayakwadi Water Supply  Sarkarnama
मराठवाडा

Jayakwadi Water Supply : समन्यायी पाणी वाटपावरून पश्चिम महाराष्ट्र - मराठवाड्यात संघर्षाची ठिणगी ; लोकप्रतिनिधीही चिंतेत

सरकारनामा ब्यूरो

Jalna Political News : राज्यात आणि विशेषतः मराठवाड्यात पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. अशातच आता समन्यायी पाणी वाटपाच्या नियमानुसार पश्चिम महाराष्ट्रातील भरलेल्या धरणातून जायकवाडी धरणातून पाणी सोडावे अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांकडून होऊ लागली आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र विरुद्ध मराठवाडा असा संघर्ष भडकण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, या संकटात शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिलो नाही, तर आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत याचा परिणाम होणार याची जाणीव असल्याने मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींनीही चिंतेत आहेत. अशातच घनसावंगीचे आमदार राजेश टोपे यांनी या संदर्भात नुकतीच बैठक घेत मतदारसंघातील शेतपिके आणि शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा आढावा घेतला. शेतकऱ्यांनी पेरणी केली, पण पाऊस-पाणी नसल्याने पिके जळून जात आहेत. त्यामुळे जायकवाडी धरणातून पिकांसाठी पाणी सोडावे अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे. (Jalna News)

दरम्यान, जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून शेतीसाठी पाणी सोडण्यासाठी नुकतीच जायकवाडी कालवा समितीचे सदस्य आणि याभागातील लोकप्रतिनिधींची बैठक नुकतीच पार पडली. जायकवाडी धरणात सध्या ३३ टक्के जिवंत पाणीसाठा उपलब्ध असून ७२८ द.ल.घ.मी. पाणी उपलब्ध आहे. यातून खरीप पिकाला पाणी देण्यासाठी २०२ एम.एम.क्यू.पाणी उपलब्ध आहे. यामधून ताबडतोब एक रोटेशन लगेच दिले पाहिजे, अशी आग्रही मागणी या बैठकीत टोपेंसह सर्वानीच केली.

१ सप्टेंबर रोजी पाणी रोटेशन सोडण्यात येणार आहे. हे रोटेशन २५ दिवस चालणार असून १८० एम.एम.क्यू पाण्याचा वापर यातून होणार आहे. एमडब्लूआरआरए २००५ च्या कायद्यानुसार ११ अन्वये सी प्रमाणे १५ ऑक्टोबरमध्ये जी जायकवाडी धरणाची स्थिती असते. त्या स्थितीनुसार वरच्या धरणातून पाणी सोडण्याची तरतूद आहे. त्यानुसार पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली. जायकवाडीसह त्यावरील धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध आहे.

निळवंडे, भंडारदरा, नांदूरमधमेश्वर ही धरणेही शंभर टक्के भरली आहेत. पुणेगाव ८८, दारणा ९३, मुकणे ७७, वाकी ६१ टक्के, तर भाम, भावली व बालदेवी या तिन्ही धरणात १०० टक्के पाणीसाठा आहे. १५ ऑक्टोबरची स्थिती पाहता या धरणातून ६५ टक्क्यापेक्षा पेक्षा जर जायकवाडी धरणाचा साठा कमी असेल तर वरील धरणातून पाणी सोडण्यात यावे. रब्बी पिकांसाठी एक किंवा दोन परिस्थितीनुसार जायकवाडी डाव्या कालव्यातून पाणी देण्यासाठी तरतूद करावी, अशी मागणीही टोपे यांनी बैठकीत केली. (Jalna Political News)

जालना जिल्ह्यातील अंबड- घनसावंगी व परतूर तालुक्यात पावसाचे प्रमाणे कमी आहे. जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडल्यास सोयाबीन, कापूस, मुग, उडीद, मका, बाजरी, तुर, ऊस यांसारख्या पिकांना जीवदान मिळेल. तसेच अंबड-घनसावंगी व परतूर तालुक्यातील कालव्याच्या कार्यक्षेत्रातील कालवा परिसरातील बोअरवेल आणि विहीरीचे पुनर्भरण होण्यास देखील मदत होणार, असल्याचे टोपे यांनी सांगितले.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT