Nashik Politics : नाशिक जिल्ह्यात ठाकरे गटाला खिंडार; नगरसेवक-पदाधिकारी-शेकडो कार्यकर्ते शिंदेंच्या शिवसेनेत!

Shiv Sena News : "नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात भगवे वादळ.."
Nashik Politics : Shiv Sena News
Nashik Politics : Shiv Sena News Sarkarnama

Thane News : शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या पुढाकाराने नाशिक जिल्ह्याच्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील नगरसेवक, महिला आघाडीच्या पदाधिकारी, असंख्य कार्यकर्त्यांनी शनिवार 26 ऑगस्ट रोजी धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृतीदिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यातील आनंद आश्रम येथे शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला. एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या पक्षप्रवेशाने नाशिक जिल्ह्यात उध्दव ठाकरे गटाला मोठे खिंडार पडले आहे. (Latest Marathi News)

Nashik Politics : Shiv Sena News
NCP Leader Sunil Tatkare News : आता माघार नाही, पुढेच जाणार ; तटकरेंनी स्पष्टच सांगितले...

शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी गेल्या आठवड्यात चांदवड दौऱ्यावर असताना ठाकरे गटाच्या अनेक नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी त्यांची गुप्त भेट घेतल्याची बातमी समोर आली होती. एकच आठवड्यात भाऊसाहेब चौधरी यांनी ठाकरे गटाला धक्का देत नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात भगवे वादळ आणले आहे. भाऊसाहेब चौधरी यांच्या या रणनीतीचे राजकीय स्तरावरही कौतुक होत आहे.

शिवसेनेचे नाशिक शहर प्रमुख संदीप उगले, चांदवड नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष कविता संदीप उगले, नगरसेवक बाळू वाघ, नगरसेवक जगन राऊत यांचे चिरंजीव निखिल राऊत, उपशहरप्रमुख दीपक चंद्रकांत शिरसाट आदी पक्ष पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटाची साथ सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे. याशिवाय उद्धव ठाकरे गटाच्या कळवण तालुका व कळवण शहर महिला आघाडी पदाधिकाऱ्यांनीही शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश करून ठाकरे गटाला धक्का दिला आहे.

Nashik Politics : Shiv Sena News
Baramati Politics : 'पंतप्रधान मोदींवर टीका करणाऱ्यांनी विचार करावा'; अजित पवारांचा शरद पवार गटाला सल्ला ?

शिवसेनेत पक्षप्रवेश केलेल्या महिलांमध्ये सत्यवती ललित आहेर, काळवण शहरप्रमुख, वैशाली सोमवंशी उपशहरप्रमुख, सीमा पगार उपशहरप्रमुख, सुरेखा पगार उपशहरप्रमुख, सविता पगार शाखाप्रमुख, सोनल येवला उपतालुका प्रमुख, भारती गुजर उपतालुका प्रमुख, सुनंदा ऐशी गटप्रमुख,, प्रतिभा गोसावी गणप्रमुख, रोहिणी मेंद गणप्रमुख, रेखा जाधव गणप्रमुख हे असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या पुढाकाराने शिवसेनेत दाखल झाले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com