Congress Presidential Election News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Congress : अशोक चव्हाणांचे मत थरूर की खर्गेंच्या पारड्यात ?

देशभरातील एकूण ५६६ प्रदेश प्रतिनिधी म्हणून निवडून गेलेल्या मतदारांनाच या निवडणुकीत मतदानाचा अधिकार होता. (Congress Leader Ashok Chavan)

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : अखिल भारतीय काॅंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदासाठी आज मतदान होत आहे. महाराष्ट्रातील मतदारांसाठी मुंबई येथील टिळक भवन प्रदेश कार्यालयात मतदानाची व्यवस्था करण्यात आली होती. (Congress) राज्याचे माजी मंत्री व काॅंग्रेस नेते आमदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.

कित्येक वर्षांनी गांधी घराण्याबाहेरील व्यक्ती अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी रिंगणात आहे. शशी थरूर आणि मलिकार्जून खरगे यांच्यात अध्यक्षपदासाठी थेट लढत होत आहे. (Aurangabad) अशोक चव्हाणांनी आपले मत कोणाच्या पारड्यात टाकले? याची उत्सूकता सर्वांना लागली आहे.

अशोक चव्हाण यांचे मल्लिकार्जून खर्गे यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. शशी थरूर यांच्यांशी त्यांचा फारसा संपर्क आलेला नाही. त्यामुळे चव्हाण आणि त्यांचे समर्थक आपले मत खर्गे यांच्या पारड्यात टाकण्याची शक्यता अधिक असल्याचे बोलले जाते. देशभरातील एकूण ५६६ प्रदेश प्रतिनिधी म्हणून निवडून गेलेल्या मतदारांनाच या निवडणुकीत मतदानाचा अधिकार होता. १९ आॅक्टोबर रोजी मतमोजणी होणार असून त्या दिवशीच काॅंग्रेसचा नवा अध्यक्ष कोण असेल हे स्पष्ट होईल.

दरम्यान, औरंगाबाद येथून १३ मतदारांनी आज मुंबईत टिळक भवन येथे अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आपल्या मतदानाचा अधिकार बजावल्याचे सांगितले जाते. यात डाॅ. कल्याण काळे, एम.एम. शेख, प्रकाश मुगदिया, जितेंद्र देहाडे, नामदेव पवार, अनिल पटेल, डाॅ. जफर खान, विलास औताडे, किरण पाटील डोणगांवकर, नारायण जाधव, आबेद जहागिरदार, विजय दौड यांचा समावेश आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT