Hingoli : `कानाखाली आवाज`ची भाषा करणाऱ्या बांगरांना शिंदे-फडणवीसांकडून कानपिचक्या..

सरकारमध्ये आहोत याचे भान ठेवून काम करा, विरोधकांना टीकेची संधी देवू नका, असे बांगरांना सांगण्यात आले. विशेष म्हणजे मुख्यमंत्री शिंदे यांनी यापुर्वीच बांगरांना समज दिली होती. (Mla Santosh Bangar)
Cm Eknath Shinde-Mla Santosh Bangar News, Hingoli
Cm Eknath Shinde-Mla Santosh Bangar News, HingoliSarkarnama

हिंगोली : कळमनुरी-औढ्याचे आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदारसंघातील अधिकाऱ्यांना धमकावणे, विमा कंपन्यांच्या कार्यालयांची तोडफोड करणे, गद्दार म्हणणाऱ्या विरोधकांच्या कानाखाली आवाज काढण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. नुकतीच त्यांनी कृषी अधिक्षकाला कानाखाली आवाज काढण्याची धमकी दिली होती. सातत्याने वादात सापडणाऱ्या आणि कानाखाली आवाजाची भाषा करणाऱ्या आमदार बांगर (Santosh Bangar) यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,(Eknath shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगल्याच कानपिचक्या दिल्याची माहिती आहे.

संतोष बांगर यांच्या सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाण, कार्यालय फोडण्याच्या घटनेमुळे सरकारची बदनामी होत आहे. (Hingoli) मतदार संघातील कामे प्रशासकिय नियमा नुसार करुन घ्या, विरोधकांना टिकेची संधी देऊ नका, अशा शब्दात बांगर यांना समज देण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करतांना बनवाबनवी करत असल्याचा आरोप करत बांगर यांनी कृषी अधिक्षकाला कानाखाली आवाज काढीन, अशी धमकी नुकतीच दिली होती.

एवढेच नाही तर एका कृषी अधिकाऱ्याला आपल्या कार्यालयात अडीच ते तीन तास बसवून ठेवले होते. विमा कार्यालयात जाऊन बांगर यांच्या समक्ष त्यांच्या समर्थकांनी तोडफोडही केली होती. कळमनुरी व औंढा तालुक्यात पीकविमा कंपनीकडून चुकीचे सर्वेक्षण होत असल्याच्या तक्रारी आपल्याकडे मोठ्या प्रमाणात येत असल्याचे सांगत बांगर यांनी याचा जाब विचारण्यासाठी कृषी अधिक्षकांसह, अधिकाऱ्यांला धारेवर धरले होते. या शिवाय कृषी अधिकाऱ्यांना सोबत घेऊन हिंगोली शहरातील पिक विमा कंपनीचे कार्यालय देखील फोडले होते.

यापुर्वी देखील मतदारसंघात आपल्याला कोणी गद्दार म्हणत असेल तर त्यांच्या कानाखाली आवज काढा, असे आवाहन त्यांनी आपल्या समर्थकांना केले होते. तर एका व्यवस्थापकांच्या कानशीलात लगावत बांगर यांनी वाद ओढावून घेतला होता. बांगर यांच्या वर्तणुकीमुळे सरकारची बदनामी होत असल्याने अखेर शिंदे-फडणवीस यांनी त्यांचे चांगलेच कान टोचले.

Cm Eknath Shinde-Mla Santosh Bangar News, Hingoli
Shivsena : ये डर जरूरी है.. अंधेरीतील माघारीनंतर उद्धवसेनेने भाजपला डिवचले..

सरकारमध्ये आहोत याचे भान ठेवून काम करा, विरोधकांना टीकेची संधी देवू नका, असे बांगर यांना सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापुर्वीच बांगरांना समज दिली होती. पण त्याचा फारसा परिणाम बांगरावर झाल्याचे दिसले नाही. आता मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री या दोघांनीही दिलेली समज बांगरांच्या किती पचनी पडते हे लवकरच स्पष्ट होईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com