Marathwada : जिल्ह्यातील भोकर आणि हिमायतनगर कृषी उत्पन्न बाजार समितीवर (Nanded District APMC News) पुन्हा एकदा कॉंग्रेसने वर्चस्व मिळवले. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी आपापले गड राखले. कुंटुरमध्ये मात्र उमेदवार जाहीर झाल्यानंतर युतीवर तोडगा काढण्यात आला आणि एक दुसऱ्याला पाठिंबा देवून काँग्रेस - भाजपची युती झाली.
नवीन युती करुन (Congress) काँग्रेस - भाजप युतीच्या सर्वच्या सर्व १७ उमेदवाराचा एकतर्फी विजय झाला. जिल्ह्यातील पाच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीपैकी नायगाव बाजार समिती निवडणुक बिनविरोध झाली. (Nanded) त्यात काँग्रेस आणि भाजपने जागा वाटून घेत निवडणुक बिनविरोध काढली आहे. उर्वरित चार बाजार समितीच्या निवडणुकीसाठी मतदान घेण्यात आले होते.
हिमायतनगरला काँग्रेसचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी `एकला चलो रे` म्हणत सर्व विरोधकांना धूळ चारली. (Marathwada) सर्वच्या सर्व १८ जागा जिंकून त्यांनी एकहाती सत्ता प्रस्थापित केली. उध्दव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर तसेच बाळासाहेबांची शिवसेना गटाचे नेते माजी जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर यांनी भाजपला सोबत घेऊन मोठे आव्हान उभे केले.
मात्र या प्रतिष्ठेच्या लढतीत आमदार जवळगावकर विजेते ठरले आणि विरोधक चारीमुंड्या चित झाले. कुंटूरमध्ये मात्र ऐनवेळेस दगाफटका होण्याचे संकेत मिळाल्याने भाजप आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी एकमेकांशी संपर्क साधत युतीवर तोडगा काढण्यात यश मिळवले. एक दुसऱ्याला पाठिंबा देवून काँग्रेस - भाजपची युती होऊन सर्वच्या सर्व १७ उमेदवारांचा एकतर्फी विजय झाला. त्यामुळे नायगाव आणि कुंटुरला सोयीचे राजकारण पहायला मिळाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.