Nanded Loksbha By-Election 2024 Sarkarnama
मराठवाडा

Nanded Loksabha By-Election News : नांदेडमध्ये काँग्रेसकडून रविंद्र चव्हाण यांची उमेदवारी जाहीर

Congress candidate announced for Nanded Lok Sabha by-election : राहुल गांधी यांनी नायगाव येथे चव्हाण कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली होती. तेव्हा त्यांनी चव्हाण कुटुंबीयातील प्रत्येक व्यक्तीशी स्वतंत्रपणे चर्चा करून त्यांची माहिती घेतली होती.

Jagdish Pansare

Congess Political News : लोकसभेच्या नांदेड मतदारसंघातून पोटनिवडणुकीसाठी अपेक्षेप्रमाणे काँग्रेस महाविकास आघाडीने रविंद्र चव्हाण यांची उमेदवारी जाहीर केली. पाच महिन्यापुर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत नांदेड मतदरासंघातून काँग्रेस महाविकास आघाडीचे वसंतराव चव्हाण हे 60 हजारांच्या मताधिक्याने विजय झाले होते. परंतु 26 आॅगस्ट 2024 रोजी त्यांचे निधन झाले. त्यानंतर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसोबतच नांदेड लोकसभा पोटनिवडणुक जाहीर झाली होती.

दरम्यान, वसंतराव चव्हाण यांच्या निधनानंतर काँग्रेसचे नेते लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नायगाव येथे चव्हाण कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली होती. (Nanded) तेव्हा त्यांनी चव्हाण कुटुंबीयातील प्रत्येक व्यक्तीशी स्वतंत्रपणे चर्चा करून त्यांची माहिती घेतली होती. तसेच वसंतराव चव्हाण यांच्या निधनानंतर काँग्रेस पक्ष आणि आपण स्वतः त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी उभे आहोत, अशी ग्वाही दिली होती.

अखेर राहुल गांधी यांनी आपला शब्द खरा करून दाखवत वसंतराव चव्हाण यांचे चिरंजीव रविंद्र चव्हाण यांनी नांदेड लोकसभेची उमेदवारी जाहीर केली. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ऐन लोकसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. यामुळे अडचणीत सापडलेल्या काँग्रेसने निष्ठावंत वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी देत विपरित परिस्थितीत नांदेडची जागा जिंकली होती.

दुर्दैवाने वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले आणि काँग्रेसला (Congress) नव्याने पोटनिवडणुकीला सामोरे जावे लागत आहे. वसंतराव चव्हाण यांच्या निधनामुळे असलेली सहानुभूती पाहता काँग्रेसला ही जागा जिंकण्याचा विश्वास वाटतो. आता महायुतीकडून कोणाला उमेदवारी दिली जाते? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, असे प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जाते.

मात्र महायुतीसह इतर पक्षांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. काँग्रेसचा उमेदवार जाहीर झाल्यामुळे येत्या दोन-तीन दिवसात महायुती रविंद्र चव्हाण यांच्याविरोधात कोणाला मैदानात उतरवणार? हे स्पष्ट होईल. याशिवाय वंचित, एमआयएम या पोटनिवडणुकी संदर्भात काय भूमिका घेणार? याकडेही सगळ्यांचे लक्ष असणार आहे.

रविंद्र चव्हाण हे नायगाव एज्युकेशन सोसायटीचे काम पाहतात. या संस्थेचे तालुक्यात जाळे पसरलेले आहे. शाळा, महाविद्यालय, डीएड, बीएड, एमफार्मसी विद्यालये या संस्थेच्या माध्यमातून चालवले जातात. रविंद्र चव्हाण यांचा राजकारणाशी तसा थेट संबंध कधी आला नाही. सहा महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत वडील दिवंगत नेते वसंतराव चव्हाण यांच्या प्रचारीची रविंद्र चव्हाण यांनी यशस्वीपणे सांभाळली होती. नायगाव विधानसभा मतदारसंघात त्यांचा चांगला जनसंपर्क असुन एक मितभाषी तरुण कार्यकर्ता म्हणून ते ओळखले जातात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT