Nanded Political News : महायुतीत श्रेयवादाची लढाई, भाजप आमदाराच्या कार्यक्रमावर शिवसेनेचा बहिष्कार

Shiv Sena's boycott of BJP's event in Nanded : तीर्थक्षेत्र माहूर ची पेयजल समस्या मार्गी लागण्यासाठी पैनगंगा नदी वर उच्च पातळी बंधारा निर्माण करावा, अशी मागणी मागील 8 ते 10 वर्षापासून प्रलंबित होती.
MLA Bhimrao Keram-Hemant Patil News
MLA Bhimrao Keram-Hemant Patil NewsSarkarnama
Published on
Updated on

साजीद खान

Shivsena V/S BJP Politics News : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकते. या पार्श्वभूमीवर विकासकामांचे लोकार्पण, भुमीपूजन, उद्घाटनांचा मतदारसंघामध्ये धडाका सुरू आहे. मात्र महायुतीतील भाजप-शिवसेना या दोन पक्षांमध्ये श्रेयवाद रंगला आहे. यातून भाजपचे किनवटचे आमदार भीमराव केराम यांच्या उपस्थीत कार्यक्रमावर शिवसेनेने चक्क बहिष्कार टाकला.

धानोडा उच्च पातळी बंधाऱ्याच्या कामाचे भुमीपूजन आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते आयोजित करण्यात आले होते. परंतु या बंधाराऱ्याला तत्कालीन हिंगोलीचे शिवसेना खासदार हेमंत पाटील (Hemant Patil) यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे मिळाली होती. त्यामुळे याचे खरे श्रेय हेमंत पाटलांचे असल्याचा दावा माहूरचे शिवसेना तालुकाप्रमुख सुदर्शन नाईक यांनी केला. पुरावा म्हणून त्यांनी हेमंत पाटील खासदार असतांना त्यांनी या बंधाऱ्यासाठी केलेल्या पाठपुराव्याचे पत्रच सादर केले.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीत सुरू झालेल्या या श्रेयवादामुळे विरोधकांना मात्र आनंदाच्या उकळ्या फुटत आहेत. केवळ विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन झालेल्या भूमिपूजन कार्यक्रमाला आमचा विरोध असल्याचे नाईक यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी डिसेंबर 2023 मध्ये बंधाऱ्याच्या भूसंपादन प्रक्रियेला हिरवा कंदील दिला होता.

MLA Bhimrao Keram-Hemant Patil News
Ex.Mp Hemant Patil News : खासदारकीची तहान हळद केंद्राचे अध्यक्षपद देऊन भागवली

माहूर जवळच्या पैनगंगा नदीवरील उच्च पातळी बंधाऱ्याच्या मंजुरीसाठी तत्कालीन खासदार हेमंत पाटील यांनी प्रयत्न करून हा बंधारा गत वर्षीच त्यांच्या कार्यकाळात मंजूर करून घेतला होता. (Nanded) विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन आज सोमवार (ता.14) रोजी झालेल्या भूमिपूजनला आमचा विरोध असून धानोडा उच्च पातळी बंधाऱ्याच्याचे श्रेय हेमंत पाटलांचे आहे.

तीर्थक्षेत्र माहूर ची पेयजल समस्या मार्गी लागण्यासाठी पैनगंगा नदी वर उच्च पातळी बंधारा निर्माण करावा, अशी मागणी मागील 8 ते 10 वर्षापासून प्रलंबित होती. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेमंत पाटील यांच्या उपस्थितीत हिवाळी अधिवेशनात माहूर लगत च्या पैनगंगा उच्चपातळी बंधाऱ्या संदर्भात मुख्य सचिव दीपक कपूर यांच्या कक्षात बैठक होऊन डिसेंबर 2023 मध्ये हा विषय मार्गी लावला आहे.

MLA Bhimrao Keram-Hemant Patil News
Mahayuti Government: योजनांचा सपाटा, कोट्यवधी रुपयांची मत पेरणी; महायुतीला निवडणुकीत फायदा होणार का?

त्याचवेळी भूसंपादन करण्याचे आदेश सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले होते. मात्र आता विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन करण्यात येणारे भूमिपूजन हा श्रेय लाटण्याचा प्रकार आहे. या भूमिपूजनास आमचा विरोध असल्याने आम्ही कार्यक्रमा ला गैरहजर राहिलो, असे नाईक यांनी स्पष्ट केले. माजी खासदार हेमंत पाटील यांच्याच अथक प्रयत्नाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा बंधारा मंजूर केला, असेही नाईक यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com