Archana Patil-chakurkar , Devendrafadnavis  Sarkarnama
मराठवाडा

Latur Congress News : काँग्रेसच्या नेत्या अर्चना पाटील चाकूरकर उद्या करणार भाजपमध्ये प्रवेश; फडणवीसांची घेतली भेट

Sachin Waghmare

Latur News : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सूनबाई अर्चना पाटील चाकूरकर या भाजपच्या वाटेवर आहेत. त्यांनी शुक्रवारी दुपारी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. शनिवारी त्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, बसवराज पाटील यांच्यापाठोपाठ अर्चना पाटील चाकूरकर या देखील भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. यामुळे मराठवाड्यातून भाजपात प्रवेश करणाऱ्या या नेतेमंडळीमुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. एकेकाळी मराठवाडा हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र या नेत्याच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. (Latur Congress News)

मराठवाड्यातील नेते अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मराठवाड्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता होती. त्यानंतर काही दिवसांनी शिवराज पाटील चाकूरकर यांचे मानसपुत्र माजी राज्यमंत्री बसवराज पाटील मुरुमकर यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.

येत्या काळात काँग्रेसमध्ये फक्त देशमुख गटाचे वर्चस्व मराठवाड्यात असणार आहे. त्यामुळेच अर्चना पाटील चाकूरकर यांनी राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे समजते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकरांची (Shivraj patil) सून अर्चना पाटील या भाजपमध्ये प्रवेश करत असल्याची चर्चा जोर धरत आहे. याबाबतही चाकूरकर गटातून कोणतीही प्रतिक्रिया येताना दिसत नाही. त्यामुळे येत्या काळात त्यांच्याकडून या प्रवेशाबाबत काय प्रतिक्रिया येणार याची उत्सुकता लागली आहे.

R

SCROLL FOR NEXT