Congress News : प्राप्तिकर विभागाची नोटीस काँग्रेसला कंगाल करणार

Income Tax Department : प्राप्तिकर विभागाने काँग्रेसची बँक खाती गोठवली आहेत. त्यामुळे ऐन निवडणुकीत पक्षाची आर्थिक कोंडी झाल्याचा दावा नेत्यांकडून केला जात आहे.
Sonia Gandhi, Mallikarjun Kharge, Rahul Gandhi
Sonia Gandhi, Mallikarjun Kharge, Rahul GandhiSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : ऐन लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत प्राप्तिकर विभागाने काँग्रेसभोवतीचा (Congress News) फास चांगलाच आवळला आहे. विभागाने पक्षाला पुन्हा कर वसुलीची नोटीस पाठवली आहे. या वेळी विभागाने तब्बल 1 हजार 700 कोटींच्या वसुलीसाठी नोटीस बजावल्याने काँग्रेसची पुरती कोंडी झाली आहे. काल दिल्ली हायकोर्टाकडूनही पक्षाला दिलासा मिळाला नाही. त्यानंतर लगेचच प्राप्तिकर विभागाकडून कारवाईला सुरुवात केली.

प्राप्तिकर विभागाने (Income Tax) काँग्रेस पक्षाकडून करवसुलीबाबत सुरू केलेली प्रक्रिया थांबवावी, या मागणीसाठी दिल्ली हायकोर्टात (High Court) याचिका दाखल करण्यात आली होती. ही याचिका काल कोर्टाने फेटाळून लावली. त्यानंतर विभागाने लगेचच पक्षाला वसुलीची नोटीस पाठवली. ही वसुली 2017-18 आणि 2020-21 या दोन वर्षांतील आहे.

Sonia Gandhi, Mallikarjun Kharge, Rahul Gandhi
PM Narendra Modi News : सरन्यायाधीश चंद्रचूड यांना 600 वकिलांचे पत्र; पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया...

प्राप्तिकर विभागाने 2017 ते 2021 या चार वर्षांच्या काळातील काँग्रेसच्या बँक व्यवहाराची तपासणी सुरू केली आहे. त्याविरोधात पक्षाकडून याचिका दाखल करण्यात आली होती. त्याआधी 2014-15 ते 2016-17 या कालावधीतील तपासणी करून पक्षाला वसुलीची नोटीस पाठवली होती. त्यानंतर पक्षाची बँक खाती गोठवण्यात आली. त्यावेळी सुमारे दीडशे कोटींची वसुलीही करण्यात आली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आता तब्बल 1 हजार 700 कोटींची नोटीस पाठवण्यात आल्याने काँग्रेससमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. कोर्टाकडूनही दिलासा न मिळाल्याने निवडणुकीतच पक्षाची कोंडी झाली आहे. काही दिवसांपूर्वीच पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi), राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी एकत्रितपणे मीडिशाशी संवाद साधताना मोदी सरकारवर निशाणा साधला होता.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी तसेच इतर पक्षाच्या इतर कामांसाठी पैसेच नसल्याचा दावा नेत्यांकडून करण्यात आला होता. बँक खाती गोठवल्याने कर्मचाऱ्यांचे वेतनही देऊ शकत नाही, असे नेत्यांनी सांगितले होते. त्यामुळे आता पुन्हा नोटीस आल्याने पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

R

Sonia Gandhi, Mallikarjun Kharge, Rahul Gandhi
Mukhtar Ansari Dies: माफिया मुख्तार अन्सारीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com