sambhaji patil nilangelkar congress sarkaranama
मराठवाडा

Congress News : लोकसभेतील विजयानं काँग्रेसचा कॉन्फिडन्स 'डबल'; संभाजी पाटील-निलंगेकरांविरोधात इच्छुकांमध्ये चढाओढ

Nilanga Vidhan Sabha : निलंगातून विधानसभा लढवण्यास इच्छुक असलेल्या भावी आमदारांच्या बॅनरबाजीला उधाण आले आहे.

राम काळगे

Latur News : लातूर लोकसभा मतदारसंघांमध्ये दणदणीत विजय मिळवल्यानंतर काँग्रेस सध्या जोमात आहे. खासदार डॉ. शिवाजी काळगे ( Shivaji Kalge ) यांच्या विजयामुळे गेल्या दहा वर्षापासून भाजपच्या ताब्यात असलेला लोकसभेचा लातूर मतदारसंघ काँग्रेसने पुन्हा खेचून आणला आहे.

या विजयाने आत्मविश्वास वाढलेल्या काँग्रेसमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने जोरदार स्पर्धा सुरू झाली आहे.

भाजपचे माजी मंत्री तथा विद्यमान निलंगा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संभाजी पाटील-निलंगेकर ( Sambhaji Patil Nilangekar ) यांच्याच मतदारसंघात भाजप पिछाडीवर जाऊन काँग्रेसच्या काळगे यांना येथून 20 हजारांपेक्षा जास्त मताधिक्य मिळाले. त्यामुळे निलंगातून विधानसभा लढवण्यास इच्छुक असलेल्या भावी आमदारांच्या बॅनरबाजीला उधाण आले आहे.

खासदार शिवाजी काळगे लोकसभेत विजयी झाल्यानंतर आजपासून जिल्ह्यात आभार दौरा करत आहेत. या निमित्ताने ते आज निलंगा शहरात दुपारी चार वाजता येणार असून त्यांच्या स्वागतासाठी तसेच स्थानिक काँग्रेस ( Congress ) नेत्यांच्या वाढदिवसाच्या बॅनरची गर्दी झाली आहे. विशेष म्हणजे या बॅनरवर संबंधितांनी 'भावी आमदार' असा उल्लेख केल्याने पक्षामध्ये आतापासूनच विधानसभेचे उमेदवारीवरून स्पर्धा सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे.

निलंगा येथील स्थानिक पदाधिकारी डॉ.अरविंद भातंबरे यांचाही आज वाढदिवस आहे. या निमित्ताने त्यांना शुभेच्छा देणाऱ्या बॅनरवर भावी आमदार असा उल्लेख करण्यात आला असून विधानभवनाचे चित्र ठळकपणे यावर दर्शवण्यात आले आहे. काँग्रेसचे दुसरे स्थानिक नेते अभय सोळुंके यांचा 16 जून रोजी वाढदिवस आहे.

खासदार काळगे यांच्या आभार दौऱ्यानिमित्त त्यांचे स्वागत व अभय सोळुंके यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर निलंगा शहरात लावण्यात आले आहे. यातही त्यांचा भावी आमदार असा उल्लेख करण्यात आला असून विधानभवनाचे चित्र बॅनर वर ठळकपणे दिसते. एकूणच खासदार काळगे यांच्या आभार दौऱ्यानिमित्ताने भावी आमदारांचे शक्ती प्रदर्शन आणि स्पर्धा सुरू आहे.

( Edited By : Akshay Sabale )

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT