(Video) Abdul Sattar Vs Raosaheb Danve : अब्दुल सत्तार कधी कोणाशी एकनिष्ठ राहिलेत, ते माझ्याशी राहतील; दानवेंनी निशाणा साधला

Jalna Lok Sabha constituency : मी काय फक्त अब्दुल सत्तार यांच्याच मतदारसंघात पिछाडीवर आहे का?
Abdul Sattar-Raosaheb Danve
Abdul Sattar-Raosaheb Danve Sarkarnama

Mumbai, 13 June : अब्दुल सत्तार यांचा इतिहास तुम्ही तपासून पाहा. ते कधी कोणाशी एकनिष्ठ राहिले आहेत का? मग ते माझ्याशी कसे एकनिष्ठ राहतील? काँग्रेसचे अशोक चव्हाण यांच्यासोबत मंत्रिमंडळात होते, त्यांना सोडून दिलं. एकदा ते अपक्ष होते, मध्यंतरी ते भाजपमध्ये यायला लागले होते. आता ते शिवसेनेत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी माझा शिवसेनेसोबत प्रासंगिक करार आहे, असे म्हटले होते. त्यामुळे त्यांचा रस्ता कोणता आहे, ते कोणत्या रस्त्याने चालले आहेत, असे सांगून माजी केंद्रीय मंंत्री रावसाहेब दानवे यांनी सत्तार यांची हिस्ट्रीच बाहेर काढली.

जालना (Jalna) लोकसभा मतदासंघातून रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांचा नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election ) पराभव झाला आहे. त्या निवडणुकीत अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी काही विधाने केली होती, त्या अनुषंगाने दानवे हे एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी सत्तारांचा संपूर्ण इतिहासच बाहेर काढला.

सिल्लोडच्या आजूबाजूच्या जमिनी हडपण्याचा प्रकार सध्या सुरू आहे. एमआयडीसी, सरकारी कार्यालये गावाच्या बाहेर नेणे, सरकारी जागा नगरपालिकेच्या ताब्यात घेणे, नगरपालिकेच्या ताब्यात घेऊन त्या जागेवर शॉपिंग सेंटर उभा करणे, शॉपिंग सेंटर काढून ते विकणे, सिल्लोडमध्ये कोणाला दुकान टाकायचे असेल तर कोणाला परवानगी मिळत नाही. एखाद्याचा प्लॉट असेल तर त्याला बांधकाम परवाना मिळत नाही. या अन्यायाच्या विरोधात आम्ही आवाज उठवणार नाही का? मीही तिथला लोकप्रतिनिधी आहे. अब्दुल सत्तार यांचा इतिहास पाहिला तर मला हा प्रश्न फार महत्वाचा वाटत नाही, असेही दानवे यांनी स्पष्ट केले.

Abdul Sattar-Raosaheb Danve
(Video) Manoj jarange News : अंबादास दानवे, आरोग्यमंत्री तानाजी सावंत एकाचवेळी जरांगेंच्या भेटीला...

ते म्हणाले, मी काय फक्त अब्दुल सत्तार यांच्याच मतदारसंघात पिछाडीवर आहे का?. भाजपचे आमदार हरिभाऊ बागडे यांच्या मतदारसंघातही मी पिछाडीवर आहे. बदनापूरमध्येही नारायण कुचे भाजपचे आमदार असूनही त्या ठिकाणी मी मागे आहे. संतोष दानवे तर माझा मुलगा आमदार आहे, त्यांच्या मतदारसंघातही मला ९०० मतं कमी मिळाली आहेत. या अर्थ सत्तार यांचा सर्व लोकसभा मतदारसंघावर प्रभाव आहे का? माझा पराभव लोकांनी केला आहे आणि हे म्हणतात की आमच्यामुळे रावसाहेब दानवेंचा पराभव झाला आहे. याचा अर्थ माझा प्रभाव महाराष्ट्रभर आहे, हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

Abdul Sattar-Raosaheb Danve
Sambhajiraje : राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सरकार जबाबदार राहील; संभाजीराजेंचा इशारा

अब्दुल सत्तार हे 2014 मध्ये माझा पराभव घडवून त्यांच्या डोक्यावरील टोपी काढणार होते. रावसाहेब दानवे यांचा पराभव झाल्याशिवाय मी टोपी काढणार नाही, असा त्यांचा पण होता. पण मीच निवडून आलो. याचा अर्थ त्यांनी काय चढ्ढी काढली का?. माझा पराभव हा लोकांनी केला आहे, अब्दुल सत्तारांनी माझा पराभव केला आहे का? पराभव झाल्याचे मी मान्य करतो. तरीही मी पराभवाने चिंता करत बसत नाही. माझी राजकीय पार्श्वभूमी नसतानाही लोकांनी मला सतत ३५ वर्षे निवडून दिलं आहे. लोकांनी म्हटलं आहे की आता थांबा. आता थोडं दिवस थांबायचं, असेही रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केले.

Abdul Sattar-Raosaheb Danve
Praniti Shinde : खासदार झाल्यानंतर प्रथमच मंगळवेढा दौऱ्यावर आलेल्या प्रणिती शिंदेंचा ‘टमटम’मधून प्रवास!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com