Naigaon Assembly Constituency Sarkarnama
मराठवाडा

Naigaon Assembly: मराठवाड्यातील 'या' जागेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी शरद पवार पक्षामध्ये रस्सीखेच सुरु

Mangesh Mahale

Nanded News: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात पक्षांतरे सुरू आहेत.नायगाव विधानसभेच्या जागेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये रस्सीखेच सुरु आहे. नायगाव विधानसभेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने दावा ठोकला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला नायगावची जागा सुटली तर लोकसभा पोटनिवडणुकीला काँग्रेसला फायदा होईल. रवींद्र चव्हाण लोकसभेत जातील तर नायगाव विधानसभेतून राष्ट्रवादीचा आमदार निवडून येईल, असा विश्वास नायगाव विधानसभेचे इच्छुक उमेदवार शिरिष देशमुख गोरठेकर यांनी व्यक्त केला आहे.

भाजपातून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या मीनल खतगावकर (meenal khatgaonkar) यांनी काँग्रेसकडून नायगाव विधानसभेवर दावा केला आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते शिरिष देशमुख गोरठेकर यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून नायगाव विधानसभेवर दावा केला आहे. त्यामुळे आगामी काळात नायगाव विधानसभेसाठी महाविकास आघाडीत रस्सीखेच पाहायला मिळणार आहे.

लोकसभा निवडणुकीआधी नांदेडचे माजी खासदार भास्कर खतगावकर त्यांच्या स्नुषा डॉ. मीनल खतगावकर यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. भाजपामध्ये अपेक्षाभंग झाल्यानंतर त्यांनी सहा महिन्यातच परतीचा मार्ग स्वीकारला. नांदेड लोकसभा मतदारसंघातून डॉ. मीनल खतगावकर या इच्छुक होत्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची त्यांनी भेटही घेतली होती.

भाजपाने लोकसभा निवडणुकीत प्रताप पाटील चिखलीकर यांना पुन्हा उमेदवारी दिली. त्यामुळे खतगावकर नाराज झाले होते. खतगावकर यांना विधान परिषदेवर घेण्याचे आश्वासन दिले गेले होते. पण, तिथेही संधी दिली गेली नाही. त्यामुळे ते नाराज होते. नांदेड जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सर्व शक्तिनिशी लढणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT