Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदे 'एन्कांऊटर' प्रकरणात मोठी अपडेट

Who Shot Badlapur Rape Accused CID will investigate:अक्षय शिंदे याचा एन्कांऊटर फेक असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर येत आहे.
akshay shinde
akshay shindesarkarnama
Published on
Updated on

बदलापूरच्या शाळेतील 2 विद्यार्थीनींवर अत्याचार करणारा मुख्य आरोपी अक्षय शिंदे यांचा पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मृत्यू झाला आहे. त्याच्या मृत्यूनंतर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर विविध आरोप केले जात आहे.

अक्षय शिंदे याचा एन्कांऊटर फेक असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर येत आहे. या प्रकरणाचा तपास आता केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (CID) करणार असल्याची माहिती आहे.

अक्षय शिंदे याचे शवविच्छेदन जे. जे रुग्णालयात करण्यात येत आहे. त्यानंतर त्यांचे पार्थिव त्याच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात येणार आहे. लवकरच अक्षय शिंदे यांचा शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

शिंदे याच्या एन्कांऊटर नंतर बदलापूरमध्ये पेढे वाढले, फटाके उडवून आनंद व्यक्त करण्यात आला. पुणे शहर शिवसेना पक्षाच्यावतीने पुण्यातील सारसबाग येथील कार्यालयाच्या बाहेर आनंदोत्सव साजरा करण्यात आला. विरोधकांकडून होत असलेल्या टिकेच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं.

akshay shinde
Akshay Shinde Encounter: एका शिंदेने दुसऱ्या शिंदेचा एन्काऊंटर केला,आता जनता दुसऱ्या शिंदेंचा एन्काऊंटर करेल!

शहराध्यक्ष नाना भानगिरे म्हणाले की बदलापूर येथील एका शाळेत नराधाम अक्षय शिंदे याने जे अत्याचार केले होते आणि काल त्याने जे पोलिसांवर हल्ला केला आणि पोलिसांकडून त्याच एन्काऊंटर करण्यात आले त्याबाबत महाराष्ट्र पोलिसांचं आभार मानण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये आज महिला सुरक्षित असून हे कालच्या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. या घटनेनंतर विरोधकांकडून जे राजकारण केलं जातं आहे त्याचा आम्ही निषेध करतो,असे भानगिरे म्हणाले.

अक्षय शिंदे एन्कांऊटरप्रकरणी ठाणे पोलिसांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली.वरिष्ठ पोलीस अधिकारी शैलेश साळवी यांनी घटनाक्रम सांगितला आहे. अक्षयने पोलिसांची पिस्तुल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. तसेच यावेळी त्याच्याकडून पोलिसांवर जीवघेणा हल्ला करण्याचा देखील प्रयत्न झाला आहे. या संदर्भात मुंब्रा पोलीस स्थानकात 307 कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय शिंदेसंदर्भात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com