Maharashtra Congress News: आगामी २०२९ च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेसने महाराष्ट्रातील संघटनात्मक पातळीवर महत्त्वाच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. लातूर जिल्ह्यातील दोन नेत्यांवर पक्षाने मोठी जबाबदारी सोपवली आहे. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक पाटील निलंगेकर यांची कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या प्रभारीपदी, तर माजी आमदार धीरज विलासराव देशमुख यांची धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
या नियुक्त्या महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी सिरीबेला प्रसाद व प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार झाल्या आहेत. काँग्रेसने राज्याच्या संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल करण्यास सुरुवात केली असून अनेक नवतरुण कार्यकर्त्यांना लोकसभा प्रभारीच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. अशोक पाटील निलंगेकर यांनी यापूर्वी प्रदेश सरचिटणीस म्हणून काम केले आहे तर जालना जिल्ह्याची जबाबदारीही त्यांच्याकडे देण्यात आली आहे.
त्यानंतर 2029 मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या मतदारसंघासाठी नवीन निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत. कोल्हापूर शहर लोकसभा व ग्रामीण या दोन्ही मतदार संघासाठी अशोक पाटील निलंगेकर यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत राजकीय चर्चेच्या पटलावर आलेल्या कोल्हापूर जिल्ह्यासाठी आता निलंगेकर यांच्या नियुक्तीने त्या भागातील काँग्रेसला बळ मिळणार आहे.
तर बहूचर्चित असलेल्या धाराशिव लोकसभा मतदार संघासाठी माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांची प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. लातूर जिल्ह्यातील हे दोन्ही दिग्गज नेते आता त्या भागात काँग्रेस पक्षाला कशी उभारी देतात याकडे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.