jitesh Antapurkar  Sarkarnama
मराठवाडा

Jitesh Antapurkar News : ...म्हणून काँग्रेस आमदार जितेश अंतापुरकरांनी कॅमेरे दिसताच काढला पळ

Sachin Waghmare

Nanded News : विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसची सात मते फुटली. त्यामुळे शेकापचे जयंत पाटील यांना पराभव स्वीकारावा लागला. महाविकास आघाडीचा उमेदवार पडल्याने काँग्रेसच्या फुटलेल्या आमदारांवर कारवाई करण्याचे संकेत हायकमांडने दिले आहेत. त्यामध्ये नांदेड जिल्हयातील काँग्रेसच्या दोन आमदारांची नावे घेतली जात आहेत. त्यामुळे या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शनिवारी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी जितेश अंतापुरकर आल्याचे समजताच. त्याठिकाणी माध्यम प्रतिनिधी पोहोचले होते. मात्र, त्याठिकाणी कॅमेरे दिसताच जितेश अंतापूरकर (Jitesh Antapurkar) यांनी पळ काढला. त्यानंतरही माध्यम प्रतिनिधींनी त्यांचा पाठलाग केला. यावेळी मी अद्याप काँग्रेसमध्ये असून अशोक चव्हाण यांची विकासकामांबाबत भेट घेतली होती. माझे आणि त्यांचे कौटुंबिक संबंध असल्याचे सांगत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न अंतापूरकर यांनी केला. (Jitesh Antapurkar News)

विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसच्या (Congress)आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांना पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर काँग्रेस नेत्यांची बैठकही झाली होती. या बैठकीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फ़ुटलेल्या आमदारावर कारवाई करणार असल्याचे सांगितले होते. यावेळी ज्या आमदारांनी पक्षाचा आदेश डावलला त्यामध्ये जितेश अंतापूरकर यांच्या नावाचीही चर्चा आहे. त्यामुळे काय करावे होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात माध्यम प्रतिनिधी जितेश अंतापुरकर यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी आले होते. यावेळी वृत्तवाहिन्यांचे कॅमेरे पाहून जितेश अंतापुरकर त्यांनी पळ काढला मात्र माध्यम प्रतिनिधींनी त्यांना अखेर गाठले. माझ्यावरती झालेल्या आरोपांबाबत मी सविस्तर बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची भेट ही विकासकामांबाबत घेतली होती. माझे आणि त्यांचे कौटुंबिक संबंध आहेत . ते जिल्ह्याचे नेते आहेत. त्यामुळे भेट घेऊन त्यांच्यासोबत विकास कामांवर चर्चा केली. मी काँग्रेसमध्येच आहे, असे अंतापुरकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

हायकमांड लवकरच करणार कारवाई

पक्षाने कारवाईचे संकेत दिल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये गेलेले अशोक चव्हाण यांची भेट घेतली होती. अंतापुरकर यांच्या शिवाय जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांच्यावरही क्रॉस वोटिंगचा आरोप करण्यात आला होता. मात्र, कैलास गोरंट्याल पक्षनिष्ठ असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले होते. अंतापूरकर यांच्याशिवाय आणखी एका नांदेड जिल्ह्यातील काँग्रेस आमदाराचे नाव घेतले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT