Uddhav Thackeray News : ठाकरेंवर टीकेची झोड उठवणाऱ्या शिंदेंच्या कट्टर समर्थक नेत्यानेच उद्धव यांंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा...

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांचे फायरब्रँड नेते आणि अत्यंत विश्वासू शिलेदार मानले जाणाऱ्या नेत्यानेच उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस हा शिवसैनिकांसाठी एक सण-उत्सवाप्रमाणेच असतो. आपल्या लाडक्या नेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राज्यभरातला शिवसैनिक ऊन-वारा-पाऊस या कशाचीही तमा न बाळगता मातोश्री गाठतो किंवा आहे तिथे त्यांचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करतो. बाळासाहेबांच्या नंतर आजही परंपरा तशीच असल्याचे दिसून येत आहे.

पण एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेचे दोन गट पडले. त्यानंतर ठाकरे आणि शिंदे गटात सतत आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतात. दोन्ही गटांमधून विस्तवही जात नाही. पण आता एकनाथ शिंदे यांचे फायरब्रँड नेते आणि अत्यंत विश्वासू शिलेदार मानले जाणाऱ्या रामदास कदमांनी (Ramdas Kadam) थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शनिवारी (ता.27) वाढदिवस आहे.इंडिया आणि महाविकास आघाडीसह सत्ताधारी महायुतीच्या नेतेमंडळींकडूनही उद्धव ठाकरे यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. त्यानिमित्ताने त्यांच्यावर चोहोबाजूंनी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांना भेटण्यासाठी मातोश्रीवर शिवसैनिकांची मोठी रांग लागल्याचे पाहायला मिळत आहे.

शिवसेनेच्या बंडात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची साथ सोडत एकनाथ शिंदेंसोबत गेले.यानंतर माजी मंत्री आणि विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर सातत्याने टीकेची झोड उठवली आहे. टीकेची एकही संधी सोडताना किंवा त्यांच्यावर तोंडसुख घेताना ते कधीही मागचा पुढचा विचार करत नाही. याच रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंना वाढदिवसांच्या शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे नुसत्या शुभेच्छाच नाहीत तर त्यांच्या दीर्घायुष्यासाठी कामनाही केली आहे.

Uddhav Thackeray
Maharashtra Politics : मुख्यमंत्री शिंदेंनंतर दोन्ही उपमुख्यमंत्री तातडीने दिल्लीत दाखल; अमित शाहांबरोबर रात्री बैठक!

रामदास कदम यांनी उद्धवजींना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा म्हणत त्यांना आणखी आयुष्य लाभो, अशी सदिच्छाही व्यक्त केली. पण पुढच्याच क्षणी त्यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून घरीच बसून राहिले होते. त्यामुळे त्यांना पुन्हा मुख्यमंत्रिपद मिळू नये, ते मुख्यमंत्री होऊ नये, असा टोलाही लगावला. ते मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र विकासात आणखी मागे जाईल, असेही कदम यांनी यावेळी सांगितले.

रामदास कदम नेमकं काय म्हणाले..?

शिवसेना शिंदे गटाचे आक्रमक नेते आणि धडाडती तोफ रामदास कदम यांनी वाढदिवसाच्या दिवशीच परमेश्वराकडे एक प्रार्थना केली आहे. ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांना परमेश्वराने मुख्यमंत्रिपदाची संधी दिली होती. काम करण्याची संधी होती. या संधीचं सोनं करता आलं असतं, पण त्यांना कोणताही निर्णय घेता आला नसल्याची टीका त्यांनी यावेळी केली.

उद्धव ठाकरे हे कधीच मंत्रालयात जात नव्हते. त्यामुळे ते पुन्हा मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्राचे नुकसानच होईल. मी त्यांना आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. तसेच ते पुन्हा मुख्यमंत्री होऊच नये, राज्याचं नुकसान होऊ नये अशाही शुभेच्छा देतो, असंही शिंदे गटाचे नेते रामदास कदम म्हणाले.

Uddhav Thackeray
Sharad Pawar Vs Amit Shah : अमित शहांनी बोट दाखवले, शरद पवारांनी इतिहास काढत घायाळ केले

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com