jitesh Antapurkar  Sarkarnama
मराठवाडा

MLA Jitesh Antapurkar : काँग्रेसला आणखी एक धक्का, आमदार अंतापूरकर उद्या भाजपमध्ये

Congress MLA Jitesh Antapurkar will join BJP tomorrow : तेव्हा काँग्रेसमध्ये असलेल्या अशोक चव्हाण यांचा अंतापूरकर यांच्या विजयात सिंहाचा वाटा होता. अशोक चव्हाण काँग्रेसमध्ये गेल्यानंतर त्यांचे समर्थक आमदारही पक्ष सोडतील, असे बोलले जात होते. पण विधानसभा निवडणुकीला अवकाश असल्याने चव्हाण यांच्या सल्ल्यानेच ते थांबले होते, अशी चर्चा आहे.

Jagdish Pansare

Nanded Congress-BJP Political News : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणुकीपुर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. अवघ्या पंधरा दिवसात पक्षाने त्यांना राज्यसभेवर घेत त्यांचा सन्मान केला. लोकसभा निवडणुकीत नांदेड जिल्हा काँग्रेसमुक्त होणार अशी चर्चा होती, मात्र घडले उलटेच. भाजपची नांदेड लोकसभेची आहे ती जागाही गेली. पण आता विधानसभेच्या तोंडावर अशोक चव्हाण यांनी आपली उपद्रव शक्ती दाखवायला सुरुवात केली आहे.

काँग्रेसमधील चव्हाण यांचे कट्टर समर्थक देगलूरचे आमदार जितेश अंतापूरकर उद्या (ता.30) भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. (Congress) नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे नुकतेच निधन झाले. या धक्क्यातून काँग्रेस सावरत नाही, तोच भाजपने त्यांना दुसरा राजकीय धक्का देण्याची तयारी चालवली आहे. दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोना काळात निधन झाल्यानंतर पोटनिवडणुकीत अशोक चव्हाण यांनी जितेश अंतापूरकर यांना उमेदवारी दिली होती.

तेव्हा काँग्रेसमध्ये असलेल्या अशोक चव्हाण यांचा अंतापूरकर यांच्या विजयात सिंहाचा वाटा होता. अशोक चव्हाण काँग्रेसमध्ये गेल्यानंतर त्यांचे समर्थक आमदारही पक्ष सोडतील, असे बोलले जात होते. पण विधानसभा निवडणुकीला अवकाश असल्याने चव्हाण यांच्या सल्ल्यानेच ते थांबले होते, अशी चर्चा आहे. नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या आमदारांनी केलेल्या क्राॅस व्होटिंगमध्ये अंतापूरकर यांचे नाव समोर आले होते.

पक्षाने कारवाईचा इशारा दिल्यामुळे ती होण्याआधीच जितेश अंतापूरकर यांनी भाजपची वाट धरल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या काही दिवसापासून अंतापूरकर काँग्रेसच्या रडारवर होतेच. (Ashok Chavan) उद्या मुंबईत आपल्या समर्थकांसह ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. देगलूरहुन दोन तर बिलोलीहून एका वातानुकूलित ट्रॅव्हल बस भाजपचे प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी अंतापूरकर समर्थकांना घेऊन मुंबईकडे रवाना झाले आहेत.

गेल्या आठवड्यातच हा पक्षप्रवेश सोहळा मुंबईत होणार होता. मात्र खासदार वसंतराव चव्हाण यांच्या आकस्मिक निधनामुळे तो पुढे ढकलण्यात आला. आमदार जितेश अंतापुरकर यांनी काँग्रेसच्या सार्वजनिक कार्यक्रमांकडे गेल्या काही दिवसापासून पाठ फिरवली होती. ते वेळोवेळी भाजप नेत्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याही संपर्कात असल्याची चर्चा होती. लोकसभा निवडणुकीतही अंतापूरकर पक्षाच्या प्रचारापासून लांब होते. त्यांच्यावर कारवाईचा इशाराही देण्यात आला होता.

अशोक चव्हाण भाजपवासी झाल्यानंतर अंतापूरकर जाणार हे निश्चित होते. पण त्यासाठी योग्य मुहूर्त ठरवण्यात आला होता. तो आता ठरला असून उद्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपजे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार अशोक चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत अंतापूरकर यांचा भाजप प्रवेश सोहळा होणार आहे. दरम्यान, विद्यमान आमदार इतर पक्षातून भाजपत येत असेल तर त्यांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तिकीट देण्याचा शिरस्ता पक्षात आहे.

माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण जिल्ह्यातील भोकर व देगलूर अशी दोन तिकिटे हाती घेऊन त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी घेऊ शकतात. तशी हमी घेऊनच बहुदा हा प्रवेश होत असल्याचे बोलले जाते. तर गेल्या पोटनिवडणुकीत शिवसेना सोडून भाजपत दाखल झालेल्या माजी आमदार सुभाष साबणे यांच्यापुढे या प्रवेशामुळे पेच निर्माण होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT