Latur District News Sarkarnama
मराठवाडा

Latur District News : विकासाचा एवढाच पुळका असेल तर कासारसिरशी तालुका करा

Congress : औसाच्या आमदारांनी सा.बा. विभागाचे कार्यालय इतरत्र नेऊन विकास कामाला खिळ घातली.

सरकारनामा ब्युरो

Marathwada : कासारसिरशी अप्पर तहसिल कार्यालयावरून निलंगा-औसा तालुक्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. आमदार अभिमन्यू पवार यांनी निलंगा तालुक्यातील ६३ गावे या नव्या कार्यालयाला जोडल्याचा आरोप केला जातोय. (Latur District News) तर त्याला शह देण्यासाठी भाजपचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर हे कृती समितीच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करत असल्याचे बोलले जाते. त्यामुळे स्थानिक काॅंग्रेस नेत्यांनी स्वतःला या वादापासून दूर ठेवले होते. काॅंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस व संभाजी पाटील यांचे काका अशोक पाटील निलंगेकर यांनी या वादात उडी घेतली आहे.

कासारशिरशी अप्पर तहसिल कार्यालयाचा विरोध करणाऱ्या कृती समितीने थेट काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची मंत्रालयात भेट घेवून या कार्यालयाला आणि त्यात समावेश करण्यात आलेल्या ६३ गावांना विरोध दर्शवला. त्यानंतर पटोले यांनी महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पत्र देखील पाठवले. स्थानिक नेत्यांना डावलून थेट पटोले यांच्याकडे गावकरी व कृती समितीचे लोक गेल्याने अशोक पाटील निलंगेकर चांगलेच संतापले. आमदार अभिमन्यू पवार, (Abhimanyu Pawar) संभाजी पाटील निलंगेकर (Sambhajipatil Nilangekar) यांना विकासाचा एवढाच पुळका आला असेल तर त्यांनी निलंग्याला अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय आणि कासारसिरशी तालुका करावा, असा टोला लगावला.

सध्या निलंगा व औसा विधानसभेचे आमदार यांच्या अंतर्गत राजकीय वादामुळे निलंगा तालुक्यातील औसा विधानसभा मतदार संघाला ६३ गावे जोडली गेली आहेत. (Congress) परंतु भाजपच्या राजकीय अंतर्गत गटबाजीचा फटका कासारसिरशी सर्कलच्या सामान्य नागरिकांना बसत आहे. तुमच्या अंतर्गत राजकारणाशी आमचा काहीही संबंध नाही, निलंग्याचे आमदार पडद्यामाघून व औसाचे आमदार पडदा घेऊन राजकारण करतात. कासारसिरशी सर्कलच्या काँग्रेसच्या सरपंच व उपसरपंच यांना चुकीची माहिती देऊन संभ्रम निर्माण करतात.

या सर्व गोष्टी जनतेला विश्वासात घेऊन करणे गरजेचे आहे. याकरिता दावे-प्रतिदावे करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी अधिसूची काढावी. विकास व्हावा ही आमची प्रांजळ भूमिका आहे. परंतु विकास करताना दूरदृष्टी असली पाहिजे. स्व.डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांनी निलंगा तालुकाच नाहीतर महाराष्ट्रामध्ये अनेक विकास कामे दूरदृष्टी समोर ठेऊन केली आहेत. निलंगा शहराला जिल्ह्यासारखे महत्व प्राप्त असून अनेक विभागीय कार्यालय शहरामध्ये उपलब्ध आहेत. पण ही कार्यालये टिकून राहावे यासाठी निलंग्याचे आमदार प्रयत्न करतांना दिसत नाहीत.

या उलट औसाच्या आमदारांनी सा.बा. विभागाचे कार्यालय इतरत्र नेऊन विकास कामाला खिळ घातली. कार्यालय फोडाफोडी करून इतर हलविण्याचे पाप हे आमदार महाशय करतात ही फार मोठी शोकांतिका आहे. गेल्या अनेक वर्षापासून सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये विकास कामे करण्यासाठी निधी आलेला नाही. स्वतःच्या राजकारणासाठी केलेल्या विकास कामाचे तुकडे करणे,नवीन योजना न आणणे याला विकास म्हणायचा का ?

जर दोन्ही आमदारांमध्ये व ट्रिपल इंजिन सरकार मध्ये हिम्मत असेल तर निलंग्याला अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय व कासारसिरशी तालुका करा, असे आव्हान अशोक पाटील निलंगेकर यांनी दोन्ही आमदारांना दिले. स्व.शिवाजीराव पाटील निलंगेकर हे धर्मनिरपेक्षवादी विचाराचे व काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत नेते होते. जातीवादी विचाराच्या लोकांना त्यांचे नाव वापरण्याचा नैतिक अधिकार नाही. यापुढे जर साहेबांच्या नावाचा वापर करून कोणी राजकीय पोळी भाजत असेल तर मला रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागेल, असा इशारा देखील निलंगेकर यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT