

Marathwada : निलंगा तालुक्यातील कासारसिरसी येथे होत असलेल्या अप्पर तहसील कार्यालयाचा वाद चांगलाच पेटला आहे. कोणतीही मागणी नसताना लादलेला हा निर्णय असल्याचा आरोप कृती समितीकडून केला जातोय. (Latur District News) औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी हा निर्णय घेऊन अप्पर तहसिल कार्यालय मंजूर करून घेतल्याचे संबंधित समिती आणि गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
त्यामुळे अभिमन्यू पवार यांचा पुतळा जाळत आंदोलन देखील करण्यात आले. हा वाद आता थेट मंत्रालयापर्यंत पोहचला आहे. कृती समितीने काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्याची दखल घेत पटोले यांनी देखील कासारसिरसी अप्पर तहसिल कार्यालयात समावेश केलेली गावे वगळावी, असे पत्र महसूल मंत्र्यांना दिले आहे. (Congress) स्थानिक काॅंग्रेस नेत्यांची वेगळी भूमिका असतांना पटोले यांनी मात्र संबंधित गावांच्या मागणीला पाठबळ देण्याची भूमिका घेतली आहे.
प्रस्तावित अप्पर तहसील मधील ३१ ग्रामपंचायती अंतर्गत ४१ गावे वगळून निलंगा तहसील कार्यालयालाच ठेवा, अशी मागाणी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे. (Abhimanyu Pawar) कासारसिरसी येथे नवीन अप्पर तहसील कार्यालय काही गावातील नागारिकांना विश्वासात न घेता लादण्यात आले आहे. आम्हाला निलंगा तालुका सोईचा असून कासारसिरसी हे अप्पर तहसील कार्यालय गैरसोयीचे असल्याचे सांगत दिवंगत माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर एकसंघ तालुका कृती समितीकडून विरोध केला जात आहे.
शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी कधीही तालुक्याचे विभाजन होऊ दिले नाही. शिवाय विकास हाच केंद्रबिंदू मानून सर्वांगीण विकास साधला आहे. या कृती समितीकडून येथील उपविभागीय कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करून निषेध नोंदवण्यात आला. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, महसूलमंत्री, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांची भेट घेऊन निवेदनही देण्यात आले आहे.
तालुक्यातील ३१ ग्रामपंचायतीचे ठराव आणि ४१ गावांचा समावेश या निवेदनात आहे. ज्या गावांची इच्छा नाही अशा गावांना गैरसोयीच्या खाईत ढकलले जात आहे. अनेक गावांना निलंगा सोईचे होते नव्या आदेशाने या गावांची गैरसोय होणार आहे. मात्र येथील स्थानिक काँग्रेसकडून शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे नाव, फोटो व काँग्रेसच्या नावाचा वापर करू नये, असे निवेदन दिले असले तरी प्रदेश काँग्रेसने मात्र निलंगेकरांच्या बाजूने भूमिका घेत स्थानिक नेत्यांना दणका दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.