Congress MP Ravindra Chavan Angry News Sarkarnama
मराठवाडा

Congress News : काँग्रेस खासदार रविंद्र चव्हाण संतापले, महापालिका आयुक्तांना हक्कभंग कारवाईचा इशारा!

Congress MP Ravindra Chavan expressed anger over not being invited to Amit Shah’s event : प्रोटोकॉल म्हणून लोकप्रतिनिधीला आमंत्रण देणे बंधनकारक असते, असे असताना या कार्यक्रमाचे आमंत्रण नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी आलेलं नसल्याचे सांगितले.

Jagdish Pansare

Nanded Political News : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नांदेड दौऱ्याआधीच जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. नांदेडचे काँग्रेस खासदार रविंद्र चव्हाण यांनी महापालिका आयुक्तांना हक्कभंग कारवाईसाठी पत्र देणार असल्याचा इशारा दिला. अमित शहा यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमाचे निमंत्रण न दिल्यामुळे रविंद्र चव्हाण भडकले असून त्यांनी महापालिका आयुक्तांना प्रोटोकाॅलची आठवण करून दिली आहे.

महापालिका आयुक्तांनी प्रोटोकॉलचे पालन केले पाहिजे. (Nanded) खासदार म्हणून मी त्यांच्यावर हक्कभंगाची कारवाई सुरु करण्याबाबतचे पत्र देणार असल्याचे चव्हाण यांनी माध्यमांना सांगितले. राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचे अनावरण उद्या (ता.26) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रण खासदार रवींद्र चव्हाण यांना देण्यात आले नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.

नांदेड महापालिकेच्या वतीने आयोजित पुतळा अनावरण कार्यक्रमाच्या निमंत्रणावरूनचा वाद सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. (Congress) प्रोटोकॉल म्हणून लोकप्रतिनिधीला आमंत्रण देणे बंधनकारक असते, असे असताना या कार्यक्रमाचे आमंत्रण नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी आलेलं नसल्याचे सांगितले. मला महापालिकेच्या कुठल्याच अधिकाऱ्याचा फोन आलेला नाही. महापालिकेने प्रोटोकॉल पाळायला पाहिजे, असे रवींद्र चव्हाण म्हणाले. खासदार म्हणून मला हक्कभंग संदर्भातील कारवाई करण्याचा अधिकार आहे. उद्या मी पत्र देणार असल्याचे चव्हाण यांनी सांगीतले.

आधीच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बी.आर.कदम यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत उद्या भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. खासदार अशोक चव्हाण यांनी नुकतीच कदम यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती. तेव्हापासून कदम हे भाजपामध्ये जाणार अशी चर्चा होती. आज त्यांनी काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यामुळेही खासदार रविंद्र चव्हाण संतप्त झाले आहेत. त्यातच महापालिका आयुक्तांनी त्यांना अमित शहा यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमाचे निमंत्रण न दिल्याने त्यांच्या संतापात अधिकच भर पडली.

रविंद्र चव्हाण यांनी यावेळी अशोक चव्हाण यांच्यावरही टीका केली. काँग्रेसने अशोक चव्हाण यांच्या घराण्याला मोठं करण्याचं काम 50 वर्ष केलं. मोठी मोठी पदं त्यांना दिली. तरी अशोक चव्हाण काँग्रेसमधून बाहेर पडले. निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्यांना याचा प्रचंड राग होता. तो जनतेने आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्याने वसंतराव चव्हाण यांना लोकसभेला निवडून देत मतपेटीतून व्यक्त केला.

त्यानंतर पोटनिवडणुकीत त्यांनी मला निवडून दिलं. त्यामुळे काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता हा आमचा नेता आहे. काँग्रेसचा कार्यकर्ता येणाऱ्या निवडणुकांमध्ये सर्व निवडणुका जिंकून दाखवेल, असा विश्वास आम्हाला आहे. बी.आर.कदम यांनी नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीला ते कुठं जाणार हे सांगितलेलं नाही. त्यांनी काँग्रेससाठी 40 वर्ष काम केलं आहे. ते पक्ष बदलणार आहेत हे तुमच्या माध्यमातून ऐकत आहोत. पक्ष सोडण्याचं कारण त्यांनी सांगावं, असे रविंद्र चव्हाण म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT