Ashok Chavan News : काँग्रेस जिल्हाध्यक्षांचे भाजपाकडे 'कदम', अशोक चव्हाणांच्या भेटीने चर्चेला उधाण!

Senior leader Ashok Chavan visited Congress district president Kadam at his residence, fueling speculations about a possible switch to the BJP. : अमित शहा 26 मे रोजी नांदेड दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात काँग्रेस व इतर पक्षातील बड्या माशांना गळाला लावत अशोक चव्हाण जिल्ह्यात हवा करण्याच्या तयारीत आहेत.
Ashok Chavan Meet Congress Leader News Nanded
Ashok Chavan Meet Congress Leader News NandedSarkarnama
Published on
Updated on

लक्ष्मीकांत मुळे

Nanded Political News : काँग्रेसमध्ये असताना अशोक चव्हाण यांनी ज्यांना कायम पाण्यात पाहिले त्या विद्यमान जिल्हाध्यक्ष बी.आर. कदम यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण आले आहे. अशोक चव्हाण यांनी कदम यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली आणि त्यांच्याशी तासभर चर्चा केली. अर्थात ही सदिच्छा भेट होती, मी कुठेही जाणार नाही हे ठरलेले वाक्य बोलून कदम यांनी भाजप प्रवेशाची चर्चा फेटाळून लावली आहे.

देशाचे गृहमंत्री अमित शहा येत्या 26 मे रोजी नांदेड दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात काँग्रेस व इतर पक्षातील बड्या माशांना गळ्याला लावत अशोक चव्हाण (Ashok Chavan) स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या आधी जिल्ह्यात हवा करण्याच्या तयारीत आहेत. त्याचाच भाग म्हणून त्यांच्या आणि बी.आर. कदम यांच्या भेटीकडे पाहिले जात आहे. अशोक चव्हाण काँग्रेसमध्ये असताना कदम यांच्याशी त्यांचे कधी फारसे पटले नाही. उलट त्यांना डावलण्याचाच कायम प्रयत्न झाल्याचे बोलले जाते.

परंतु, अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यानंतर आता त्यांना काँग्रेसमधील (Congress) आपल्या जुन्या सहकाऱ्यांची आठवण होऊ लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर या कट्टर प्रतिस्पर्ध्याने काँग्रेस पक्षावर अक्षरशः घाला घातला. अशोक चव्हाण यांचे मेहुणे भास्कर पाटील खतगावकर, मोहन हंबर्डे, अविनाश घाटे, ओमप्रकाश पोकर्णा या दिग्गजांना पक्षात घेत काँग्रेस पक्षासह अशोक चव्हाण यांनाही दणका दिला.

Ashok Chavan Meet Congress Leader News Nanded
Ashok Chavan-Pratap Patil Chikhlikar : अशोक चव्हाण यांच्याकडून चिखलीकरांची विकेट! मटका किंग अन्वर खानला चोवीस तासात राष्ट्रवादीतून काढले!

भाजप संघटनात्मक निवडीमध्ये नांदेड महानगरप्रमुख पदावर अमर राजूरकर यांची वर्णी लावल्यानंतर आता अशोक चव्हाण यांनी दुसऱ्या पक्षातील मोठे नेते पक्षात आणण्यासाठी भेटीगाठी सुरू केल्या आहेत. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम यांची घरी जाऊन भेट घेत त्यांना पक्ष प्रवेशाची गळ चव्हाणांनी घातल्याची जोरदार चर्चा आहे.

Ashok Chavan Meet Congress Leader News Nanded
Pune Congress News : ब्राह्मण म्हणून मला त्रास, राहुल गांधींना 100 ई-मेल! महिला नेत्याचे गंभीर आरोप, काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याची घोषणा...

लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर बी. आर. कदम यांना काँग्रेसने जिल्हाध्यक्ष पदी कायम ठेवले. त्यांची गेल्या काही महिन्यांपासून पक्षात कोंडी केली जात असल्याची चर्चा आहे. माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यांनी कदम यांना जिल्हाध्यक्ष पदावरून हटवले होते. पण पक्षश्रेष्ठींनी पुन्हा कदम यांनाच जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्त केले. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसची अवस्था जिल्ह्यात बिकट झाली आहे. अशावेळी अशोक चव्हाण कदम यांना जाऊन भेटले यातच सगळं आलं, असा या भेटीचा अर्थ काढला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com