Congress News Sarkarnama
मराठवाडा

Congress News : नांदेड पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचा चेहरा ठरला; पटोलेंनी थेट नावच सांगितले

Congress seat sharing formula : महाविकास आघाडीचे जागावाटप पूर्ण झाले नसतानाच दिल्लीतील बैठकीत नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत उमेदवार ठरला आहे.

Sachin Waghmare

Mumbai News : विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आल्यानंतर मंगळवारपासून राज्यात आचारसंहिता लागली आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. आगामी काळात होत असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती व महाविकास आघाडीचे जागावाटप अद्याप रखडलेले आहे. महाविकास आघाडीचे जागावाटप पूर्ण झाले नसतानाच दिल्लीतील बैठकीत नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत उमेदवार ठरला आहे.

दिल्लीत काँग्रेसच्या (Congress) झालेल्या बैठकीनंतर नांदेड लोकसभा मतदारसंघातून दिवंगत खासदार वसंत चव्हाण यांचे सुपुत्र रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी मिळणार आहे, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसोबतच नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक होणार आहे. काँग्रेस खासदार वसंत चव्हाण यांच्या निधनामुळे नांदेड लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. यामुळे दिल्लीतील बैठकीत नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत उमेदवार ठरला.

बुधवारी दिल्लीत काँग्रेसच्या स्क्रीनिंग कमिटीची बैठक झाली. यावेळी या मतदारसंघातून वसंत चव्हाण यांचे सुपुत्र रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी मिळणार आहे, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिली. या बैठकीत राज्यातील जवळपास 84 जागांवर चर्चा झाली. त्यापैकी 62 जागांवर बैठकीत एकमत झाले आहे.

या बैठकीत नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी दिवंगत खासदार वसंत चव्हाण यांच्याच मुलाला तिकीट जाणार असल्याचं निश्चित झालं आहे. त्यासोबतच 20 ऑक्टोबरला तारखेला होणाऱ्या सीईसी बैठकीत जागांच्या नावांवर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यात महाविकास आघाडीत कोण मोठा बहू असणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT