Nagpur Assembly Elections News : काँग्रेसने वाढवले उद्धव ठाकरेंच्या सेनेचं टेन्शन

Nagpur Vidhan Sabha News : काँग्रेसने अद्याप नागपूर जिल्ह्यात महाविकास आघाडीत जागा वाटपाच्या वाटाघाटी व्हायचे असल्याचे सांगून सेनेचे टेन्शनवाढवले आहे.
Nagpur News
Nagpur News Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : नागपूर जिल्ह्यात उद्धव सेनेने दोन मतदारसंघावर दावा केला आहे. उमेदवारांची नावेसुद्धा निश्चित केली आहेत. खाजगीत त्यांना तसे सांगण्यात आले असून त्यांनी प्रचाराला सुरुवात केली असताना काँग्रेसने अद्याप नागपूर जिल्ह्यात महाविकास आघाडीत जागा वाटपाच्या वाटाघाटी व्हायचे असल्याचे सांगून सेनेचे टेन्शन वाढवले आहे. दावा केला म्हणजे जागा सोडली असा होत नाही असे काँग्रेसचे नेते नसीम खान यांनी आज स्पष्ट केले.

नसीम खान यांनी नागपूर शहरातील सहा विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीचा (Nagpur) नागपूर जिल्ह्यातील वाटपाचे गणित निश्चित झाले नसल्याचे सांगितले. आमच्या वाटाघाटी सुरू आहेत. येत्या दोन दिवसात महाविकास आघाडीचे नेते जागा वाटपाचा निर्णय जाहीर करतील. आज घडीला नागपूर शहरातील सर्व सहा विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा कायम आहे.

Nagpur News
Devendra Fadnavis News : 'देवाभाऊ'च्या जाहिरातीनं राष्ट्रीय ओबीसी महासंघात खळबळ

काँग्रेस नेत्यांची आणि कार्यकर्त्यांचीसुद्धा हीच इच्छा आहे. अनेक वर्षांपासून शहरात काँग्रेस सर्व विधानसभा मतदारसंघात लढत आहे. काँग्रेसचे नेटवर्क सर्वत्र आहे. सक्षम उमेदवारसुद्धा आहेत. महाविकास आघाडीची भूमिका स्पष्ट आहे. ज्या मतदारसंघात जो पक्ष मजबूत आहे आणि सक्षम उमेदवार आहे त्याला जागा सोडायची असा निर्णय आधीच झाला आहे. असे सांगून नसिम खान यांनी उद्धव सेनेच्या उमेदवाराचे टेंशन वाढवले आहे.

Nagpur News
Nagpur Congress : 'सर्व काही ठरल्यावर मुलाखतींचा फार्स कशाला?' ; नागपुरात काँग्रेसच्या इच्छुकांमधून नाराजीचा सूर!

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सेनेच्या वतीने सुरुवातीला नागपूर शहरात दोन आणि ग्रामीणमध्ये दोन अशा चार विधानसभा मतदारसंघावर दावा केला होता. शहरातील दक्षिण नागपूर आणि ग्रामीणमधील रामटेक विधानसभा मतदारसंघाला त्यांचे प्राधान्य आहे. सध्याची राजकीय परिस्थिती आणि शिवसेनेचे अस्तित्व बघता शहर व ग्रामीणमधून एक अशा दोन जागा महाविकास आघाडीत मिळेल अशी शक्यता वर्तविली जात आहे. दुसरीकडे शहरात काँग्रेस एकही जागा सोडायला तयार नाही. ज्या दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघावर उद्धव सेनेने दावा केला आहे तेथे काँग्रेस निवडून येण्याची शक्यता आहे. गिरीश पांडव अवघ्या चार हजार मतांच्या फरकांनी येथून पराभूत झाले होते. दुसरीकडे मागील निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला पाच हजार मतांचा आकडाही गाठता आला नव्हता हे विशेष.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com