Harshvardhan Sapkal Attack On Mahayuti In Jalna Congress Rally Sarkarnama
मराठवाडा

Harshvardhan Sapkal : काँग्रेसच महायुतीला भिडू शकते, म्हणू पक्ष प्रवेशासाठी रीघ! हर्षवर्धन सपकाळ यांचा दावा

Harshvardhan Sapkal Attack On Mahayuti : कर्जमाफीचे आश्वासन महायुतीने दिले होते. कर्जमाफी तर दूरच, पण अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे अनुदान देखील या सरकारने अद्याप शेतकऱ्यांना दिलेले नाही.

Jagdish Pansare

  1. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दावा केला की, महायुतीला भिडण्याची ताकद फक्त काँग्रेसकडेच आहे.

  2. सपकाळ यांनी सांगितले की अनेक नेते आणि कार्यकर्ते काँग्रेसमध्ये प्रवेशासाठी उत्सुक आहेत.

  3. या विधानानंतर राज्यातील राजकीय वातावरणात काँग्रेसच्या पुनरागमनाबाबत चर्चेला उधाण आले आहे.

Jalna Political News : महाराष्ट्रातील महायुतीला केवळ काँग्रेस पक्षच भिडू शकते, ही भावना सर्वसामान्य जनतेची झाली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्यांची रीघ लागली आहे, असा दावा प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करतांना ते चोरून मुख्यमंत्री झाल्याची टीका सपकाळ यांनी केली.

जालना शहरात काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा आज पार पडला. रशीद पैलवानसह पाच माजी नगरसेवक आणि त्यांच्या समर्थकांनी पक्षात प्रवेश केला. यावेळी हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर हा पक्ष देशाचे संविधान आणि संस्कृती मिटवायला निघाल्याचा आरोप केला. भाजपचा लोकशाहीवर विश्वास नाही. सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांचा आवाज दाबला जात आहे.

शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत जाहीर करून अद्यापही मिळाली नाही. त्यामुळे ठिकठिकाणी शेतकऱ्यांचा उद्रेक दिसून येत आहे. सध्या जनतेच्या मनात सरकारच्या विरोधात मोठा असंतोष आहे. निवडणुकीआधी शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन महायुतीने दिले होते. कर्जमाफी तर दूरच, पण अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे अनुदान देखील या सरकारने अद्याप शेतकऱ्यांना दिलेले नाही.

सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा चोर मुख्यमंत्री (चोमू) म्हणून उल्लेख करत टीका केली. ते मतांची चोरी करून मुख्यमंत्री झाले आहेत. एक तारखेला या मतचोरीच्या अनुषंगाने सर्वपक्षीय मोर्चा काढून सत्ताधाऱ्यांना घाम फोडणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, सध्या काँग्रेसच महायुतीला भिडू शकते. ही भावना लोकांमध्ये निर्माण झाल्याने काँग्रेसमध्ये येणाऱ्यांची रीघ लागली आहे, असे ते म्हणाले. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अब्दुल रशीद पहेलवान यांनी त्यांच्या समर्थकांसह आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे जालना जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढेल, असा विश्वासही सपकाळ यांनी व्यक्त केला.

म्हणे जलसम्राट अन् पाण्याचा पत्ता नाही..

येणारी मनपा आणि जिल्हा परिषदेची निवडणूक काँग्रेस ताकदीने लढणार आहे. आगामी महापौर काँग्रेसचा होणार, असा दावा खासदार डॉ. कल्याण काळे यांनी केले. काँग्रेसने आपल्याला येथे ट्रस्टी म्हणून पाठवले आहे. मात्र काही लोकांचा भ्रम होता की, काँग्रेसने इथला सातबारा आपल्या नावावर केला. ते गेल्याने काँग्रेस स्वच्छ झाली, अशी टीका काळे यांनी कैलास गोरंट्याल यांचे नाव न घेता केली. कुणी कार्यसम्राट, कुणी जलसम्राट म्हणून मिरवतो, तरीही शहराला पाणी मिळाले नाही. ते पाणी आपण मिळवून देऊ, असे काळे यांनी सांगितले.

FAQs

1. हर्षवर्धन सपकाळ यांनी काय विधान केले?
त्यांनी म्हटलं की महायुतीला सध्या महाराष्ट्रात भिडू शकणारी एकमेव ताकद काँग्रेसकडेच आहे.

2. सपकाळ कोणत्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत?
ते काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहेत.

3. काँग्रेसमध्ये प्रवेशासाठी कोण उत्सुक आहे?
राज्यातील अनेक माजी आमदार, स्थानिक नेते आणि कार्यकर्ते काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत.

4. या विधानाचा राजकीय अर्थ काय आहे?
हे विधान काँग्रेसच्या आत्मविश्वासाचं आणि आगामी निवडणुकांसाठीच्या तयारीचं प्रतीक मानलं जात आहे.

5. महायुती म्हणजे कोणत्या पक्षांची युती?
महायुती ही भाजपा, शिंदे गटाची शिवसेना आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT