Harshvardhan Sapkal: कंत्राटदाराकडून डिफेंडर घेणारे 21 आमदार कोण? गायकवाडांचा नंबर कितवा? सपकाळांचा गोप्यस्फोट

Harshvardhan Sapkal expose 21 MLAs Defender case: हर्षवर्धन सपकाळ यांनी पुन्हा एकदा गायकवाड यांच्या गाडीचा उल्लेख करून या विषयाला फोडणी दिली आहे. २१ आमदारांना एका कंत्राटदाराने गाड्या दिला असल्याचा आरोप केला. हे सर्व लवकरच उघडकीस आणणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
Sanjay Gaikwad
Sanjay GaikwadSarkarnama
Published on
Updated on

Buldana News: सुमारे दोन कोटींच्या डिफेंडर गाडीवरून शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर पुन्हा एकदा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी निशाणा साधाला. एक बड्या कंत्राटदाराने २१ आमदारांना गाड्या वाटल्या आहेत. यात गायकवाड यांचा नंबर एकविसावा आहे की बाविसावा हा संशोधनाचा विषय आहे. मात्र याचे उत्तर लवकरच महाराष्ट्राच्या जनतेला मिळणार असल्याचा मोठा गौप्यस्फोट सपकाळ यांनी केला.

आमदार गायकवाड सुमारे दोन ते अडीच कोटी रुपये किंमतीच्या डिफेंडर गाडीतून फिरत होते. एवढी महागडी गाडी त्यांच्याकडे कुठून आली असा प्रश्न सर्वांना पडला होता. काही आमदारांनी याकडे लक्ष वेधले होते. एक कंत्राटदाराने ही गाडी भेट दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र एका कंत्राटदाराने ती गाडी आपली असल्याचा सांगून दीड कोटी रुपये यासाठी आपण कर्ज काढले असल्याचे सांगितले आहे.

आमदार गायकवाड यांच्याशी आपले मैत्रीपूर्ण संबंध आहे. त्यांना गाड्याचा छंद आहे. त्यांच्याकडे अनेक गाड्यासुद्धा आहेत. डिफेंडर गाडी बघून त्यांची उत्सुकता वाढली. त्यांनी ती गाडी काही दिवस चालवायला मागून घेतली असल्याचा दावा संबंधित कंत्राटदाराने केला होता. बँकेकडून कर्जाची कागदपत्रेसुद्धा त्यांनी दाखवली होती. मात्र यानंतरही यावर कोणाचा विश्वास बसलेला नाही.

हर्षवर्धन सपकाळ यांनी पुन्हा एकदा बुलडाण्यात गायकवाड यांच्या गाडीचा उल्लेख करून या विषयाला पुन्हा फोडणी दिली आहे. त्यांनी एकूण २१ आमदारांना एका कंत्राटदाराने गाड्या दिला असल्याचा आरोप केला. हे सर्व आपण लवकरच उघडकीस आणणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदारांकडे असलेल्या डिफेंडर गाड्यांचा मुद्दा तापणार असल्याचे दिसून येते.

Sanjay Gaikwad
Satara News: फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात एकाला अटक

सपकाळ हे बुलडाणा येथे पत्रकारांसोबत बोलत होते. "दुसऱ्याच्या गाडीवर कोणी आमदाराचा फलक लावत नाही. मी स्वतः आमदार होतो. मात्र दुसऱ्यांच्या गाडीवर आपल्या नावाचा फलक लावून कधी फिरलो नाही," असे सांगून त्यांनी ही गाडी आमदार गायकवाड यांचीच असल्याचा दावा केला. आता डिफेंडर गाड्यांचे गिफ्ट घेतलेले ते २१ आमदार आणि एवढ्या महागड्या गाड्या देणारा कंत्राटदार कोण ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आमदार संजय गायकवाड यांनी मात्र सपकाळांचे आरोप खोडून काढले. गाडीचा मालक एक कंत्राटदार आहे हे त्यांनी मान्य केले. त्यानेच ही गाडी स्वतःची असल्याचे सांगितले आहे. गाडीचे कागदपत्रे आणि बँकेच्या कर्जाचे कागदपत्राचे पुरावे त्याने जाहीर केले आहे. त्यामुळे हा विषय संपला आहे. सपकाळ हे जनाधार नसलेले नेते आहेत. त्यांनी आमच्याकडे लक्ष देण्यापेक्षा काँग्रेसच्या आमदारांकडे महागड्या गाड्या कुठून आल्या याची विचारणा करावी, असा सल्लाही गायकवाड यांनी हर्षवर्धन सपकाळ यांना दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com