Pradnya Satav.jpg Sarkarnama
मराठवाडा

Pradnya Satav News : ...म्हणून काँग्रेसच्या प्रज्ञा सातव पहिल्याच पसंतीत सहज झाल्या विजयी!

Pradnya Satav win Vidhan Parishad Election : काँग्रेसचे आमदार क्राॅस वोटिंग करणार, राष्ट्रवादी-भाजपने काँग्रेसचे आमदार फोडले, घोडेबाजार झाला अशा चर्चा कालपासून सुरू होत्या. मात्र...

Jagdish Pansare

Maharashtra Vidhan Parishad Election Result 2024 : विधान परिषदेच्या 11 जागांसाठी शुक्रवारी झालेल्या मतदानानंतर काँग्रेसने अपेक्षेप्रमाणे आपली एकमेव जागा सहज जिंकली. काँग्रेसकडे 38 मतं असल्यामुळे आणि कोट्यापेक्षा ती अतिरिक्त असल्याने काँग्रेसच्या उमेदवार प्रज्ञा सातव 25 मतं घेऊन सहज विजयी झाल्या. पहिल्या पसंतीत विजयासाठी 23 मतांची आवश्यकता होती. सातव यांनी 25 मते मिळवित विजय मिळवला.

काँग्रेसचे आमदार क्राॅस वोटिंग करणार, राष्ट्रवादी-भाजपने(BJP) काँग्रेसचे आमदार फोडले, घोडेबाजार झाला अशा चर्चा कालपासून सुरू होत्या. मात्र या सगळ्या फोल ठरवत काँग्रेसने आपली एक जागा सहज निवडून आणली. महायुतीकडून 12 उमेदवार रिंगणात असल्याने या निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती.

आज प्रत्यक्ष मतदान पार पडल्यानंतर या निवडणुकीत 100 टक्के मतदान पार पडले. राज्यातील सर्व 274 आमदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. प्रत्यक्ष मतमोजणी सुरू झाली तेव्हा एका मतावर सर्वपक्षीयांनी आक्षेप घेतल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र ते मत वैध ठरवण्यात आले.

काँग्रेसच्या प्रज्ञा सातव(Pradnya Satav) या सुरुवातीपासूनच आघाडीवर होत्या. अखेर त्यांनी 23 मतांचा कोटा पूर्ण करत 25 मतांसह विजय मिळवला आहे. अतिरिक्त मतं असल्यामुळे काँग्रेसने प्रज्ञा सातव यांना पहिल्याच पसंतीत विजयी करण्यासाठीचे नियोजन केले होते. त्यानुसार पक्षाच्या आमदारांची बैठक घेत त्यांना मतदान कसे करायचे? याचे मार्गदर्शन करण्यात आले होते.

त्यानुसार प्रज्ञा सातव यांना मतदान झाले आणि त्या पहिल्याच पंसतीत विजयी झाल्या. काँग्रेसचे दिवंगत आमदार शरद रणपिसे यांच्या रिक्त झालेल्या जागेवर प्रज्ञा सातव यांची नोव्हेंबर 2021 मध्ये बिनविरोध निवड झाली होती. कार्यकाळ संपल्यानंतर काँग्रेसने दुसऱ्यांदा सातव यांना उमेदवारी दिली.

राहुल गांधी(Rahul Gandhi) यांनी सातव यांना निवडून आणण्याचे आदेश राज्यातील काँग्रेस नेत्यांना दिले होते. सातव यांचा सहज विजय झाल्याने काँग्रेसच्या आमदारांबद्दल उठवण्यात आलेल्या चर्चा फोल ठरल्या. सातव यांच्या विजयानंतर विधानभवन परिसरात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत जल्लोष साजरा केला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT