Bharat Jodo Yatra
Bharat Jodo Yatra  sarkarnama
मराठवाडा

Bharat Jodo Yatra : सुप्रिया सुळेंनंतर आज आदित्य ठाकरे राहुल गांधींसोबत यात्रेत चालणार

सरकारनामा ब्युरो

Bharat Jodo Yatra : काँग्रेसची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली आहे.खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा सुरु आहे. भारत जोडो यात्रेचा आज (शुक्रवार) ६५वा दिवस आहे.(Rahul Gandhi Bharat Jodo Yatra latest news)

राज्यात नांदेडमधून (Nanded) सुरू झालेल्या भारत जोडो यात्रेचा (Bharat Jodo Yatra) आज पाचवा दिवस आहे. राजकीय नेत्यांसह डॉक्टर, इंजिनिअर, वकील, खेळाडू देखील या यात्रेत सहभागी होत आहेत. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद मिळत आहे.

ठाकरे गटाचे नेते, माजी मंत्री आदित्य ठाकरे हे आज (शुक्रवारी) यात्रेत सहभागी होणार आहेत, त्यांनी याबाबत काल (गुरुवारी) माध्यमांना ही माहिती दिली आहे. भारत जोडो यात्रा आज हिंगोलीत दुपारी पोहचणार आहे. आदित्य ठाकरे हे राहुल गांधी यांच्यासोबत यात्रेत चालणार आहेत.काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे कार्यकर्ते, नेते या यात्रेत सहभागी होणार असून, महाराष्ट्रातील विविध सामाजिक संघटनाही सहभागी होणार आहेत.

भारत जोडो यात्रेत राष्ट्रवादीचे नेते देखील सहभागी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jayant patil), राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड(NCP MLA Jitendra Awad) यांनी काल राहुल गांधीसह पदयात्रेत सहभाग घेतला होता.

राज्यभरातून कार्यकर्ते राहुल गांधींना साथ देण्यासाठी या यात्रेत सहभागी होणार आहेत. त्यामुळे यात्रामार्गावरील सर्व हॉटेल, मंगल कार्यालयं कार्यकर्त्यांना राहण्यासाठी बुक करण्यात आली आहेत. राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील मार्गावर ज्या दोन मोठ्या सभा होणार आहेत, त्यातील पहिली सभा काल (ता.10) नांदेडमध्ये झाली. तर दुसरी सभा 18 नोव्हेंबरला शेगाव येथे होणार आहे.

भारत जोडो यात्रेवर आरोप, प्रत्यारोप टीका सुरु आहे. याचा अर्थ यात्रेची दखल घेतल्या जात आहे. खिल्ली उडवल्या जातंय म्हणजे यात्रा गांभीर्याने घेतली जात असल्याचे जयंत पाटील यांनी काल सांगितले. राज्यात नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलडाणा अशा पाच जिल्ह्यातून 384 किलोमीटरचा प्रवास या यात्रेदरम्यान राहुल गांधी करणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT