Uddhav Thackeray : फडणवीसांच्या कौतुकानंतर राऊत शिंदे गटात जाणार का ? ; ठाकरे म्हणाले..

Uddhav Thackeray : राऊत यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
Sanjay Raut latest news
Sanjay Raut latest newssarkarnama
Published on
Updated on

Sanjay Raut : शिवसेनेत फूट पडल्यानंतर राज्यात शिंदे सरकार स्थापन झाले. 'शिवसेना कुणाची'हा वाद न्यायलयापर्यंत गेला. अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीवरुन ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात कलगीतुरा रंगला.दोन्ही गटानं शिवसेना नाव आणि चिन्ह यांच्यावर दावा केल्याने न्यायालयानं शिवसेना नाव व धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं. या कालावधीत संजय राऊत आर्थर रोड कारागृहात होते. (mp Sanjay Raut latest news)

पत्राचाळ प्रकरणातून राऊतांची काल (बुधवारी) न्यायालयाने जामिनावर सुटका केली आहे. आज (गुरुवार)राऊत यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत राऊतांनी धनुष्य़बाण गोठवल्याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला.त्यावेळी राऊतांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला.

Sanjay Raut latest news
Uddhav Thackeray : जे पक्षातून पळाले त्यांच्यासाठी हा धडा ; राऊतांच्या सुटकेनंतर ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

देशाची घटनाच गोठवण्याचा प्रयत्न होतोय..

संजय राऊत म्हणाले, "आमच्यासारख्यांना बेकायदेशीर अटक होणं हे राज्यघटना गोठवण्याचाच प्रकार आहे. राज्यघटनेला या देशात किंमत नाही. या देशाची घटनाच गोठवण्याचा प्रयत्न होतोय. आपल्या देशाची पवित्र राज्यघटना आहे,"

Sanjay Raut latest news
Sanjay Raut : राज ठाकरेंवर राऊतांचा हल्लाबोल ; म्हणाले, "मला त्यांना सांगायचयं.."

याच चुकीचे काय?

संजय राऊत म्हणाले, "तुरुंगात असताना मला तेथील अनेक समस्या, कर्मचाऱ्यांच्या अडचणी समजून घेता आल्या. राज्याचे गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांसमोर मी या सर्व समस्या मांडणार आहे. त्यासाठी त्यांची भेट घेणार आहे, याच चुकीचे काय. तसेच, तुरुंगात मी दोन पुस्तकांचे काम केले आहे. लवकरच ते सर्वांसमोर मांडणार आहे,"

Sanjay Raut latest news
Sanjay Raut : जेलबाहेर येताच पहिल्याच पत्रकार परिषदेत राऊतांनी केलं फडणवीसाचं कौतुक

राऊतांचा मुख्यमंत्र्यांना टोला

"कटुता कमी करण्याचं वक्तव्य जर फडणवीसांनी केलं असेल तर महाराष्ट्राच्या परंपरेला हे शोभणारं आहे. महाराष्ट्राची ही संस्कृती आहे. आम्ही राजकीय लढाया करतोय. राज्य ते चालवत आहेत. राज्य तेच चालवत आहेत, बाकी उंडारत आहेत,"अशी टीका राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांच्यावर केली.

...ते १०० दिवस तुरुगांत राहिलेच नसते

फडणवीसांचे राऊतांनी कौतुक केलं त्यानंतर ते शिंदे गटात जाणार का ? असा खोचक सवाल माध्यमांच्या प्रतिनिधींनी उद्धव ठाकरे यांना केला. त्याला उत्तर देताना ठाकरे म्हणाले, "संजय राऊतांना शिंदे गटात जायचं असतं तर ते १०० दिवस तुरुगांत राहिलेच नसते,"

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com