Congress News Sarkarnama
मराठवाडा

Nanded Congress News : नांदेडमध्ये काँग्रेसला धक्का; अशोक चव्हाण, अंतापूरकरांनंतर आणखी एक आमदार भाजपच्या वाटेवर

Political News : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, आमदार जितेश अंतापूरकर, माजी आमदार अमर राजूरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

Sachin Waghmare

Nanded News : राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असतानाच नांदेड जिल्ह्यात काँग्रेसला धक्यावर धक्के बसत आहेत. गेल्या काही दिवसात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, आमदार जितेश अंतापूरकर, माजी आमदार अमर राजूरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यानंतर आता काँग्रेसचे आमदार भाजपच्या वाटेवर असल्याचे समजते. त्यामुळे काँग्रेसचे हे माजी आमदार लवकरच भाजपचे कमळ हाती घेणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी त्यांच्यासोबत काही काँग्रेसमधील आमदारदेखील भाजपमध्ये (Bjp) प्रवेश करणार अशी चर्चा होती. त्यावेळी काही आमदारांनी प्रवेश करण्याचे टाळले होते. (Nanded Congress News)

आता विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असल्याने आमदार जितेश अंतापूरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आता नांदेड दक्षिण मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार मोहन हंबर्डे भाजपच्या वाटेवर असल्याचे समजते. त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली असल्याने लवकरच प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. नांदेडमध्ये पुन्हा एकदा काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे आमदार मोहन हंबर्डे यांनी गुरुवारी मध्यरात्री भाजपचे नेते तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. काँग्रेसचे आमदार हंबर्डे लवकरच भाजपचे कमळ हाती घेणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत जितेश अंतापूरकर, मोहन हंबर्डे त्यांच्यावर सुद्धा क्रॉस वोटिंगचा आरोप केला जात होता. देगलूरचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला आहे. त्यानंतर आता मोहन हंबर्डे हे देखील भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळं हंबर्डे देखील भाजपच्या वाटेवर आहेत की काय? अशी चर्चा सध्या ऐकवयास मिळत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT