Bhagirath Bhalke : भगीरथ भालकेंनी वाढविले महाआघाडीचे टेन्शन; विधानसभा निवडणुकीबाबत घेतला मोठा निर्णय...

Pandharpur-Mangalvedha Constituency : पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून विधानसभेची निवडणूक लढविण्यासाठी भगीरथ भालके हे इच्छूक आहेत. त्यासाठी त्यांनी आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दोन वेळा भेट घेतली आहे.
Bhagirath Bhalke
Bhagirath BhalkeSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 13 September : आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने इच्छुकांकडून जोरदार मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. महाविकास आघाडी किंवा महायुतीची उमेदवारी मिळो अथवा न मिळो, काही जण निवडणूक लढविण्यावर ठाम आहेत. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळाली नाही तरी कोणत्याही परिस्थितीमध्ये विधानसभेची निवडणूक लढविणारच, अशी घोषणा विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष भगीरथ भालके यांनी केली आहे.

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून विधानसभेची निवडणूक लढविण्यासाठी भगीरथ भालके हे इच्छूक आहेत. त्यासाठी त्यांनी आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दोन वेळा भेट घेतली आहे. महाविकास आघाडीतील कोणत्याही पक्षाकडून आपण निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक आहोत, असे त्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.

दरम्यान, पंढरपुरात महाविकास आघाडीत उमेदवारीवरून मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण, मतदारसंघाचे वाटप आणि उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच भगीरथ भालके यांनी निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. पंढरपूर मतदारसंघातून मागील पोटनिवडणूक राष्ट्रवादीच्या तिकिटावर भगीरथ भालके यांनी लढवली आहे, त्यामुळे हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला जातो की काँग्रेस दावा करणार, याकडे पंढरपूर-मंगळेवढ्याचे लक्ष असणार आहे.

दरम्यान, पंढरपूरमधून विधानसभेची निवडणूक लढविण्याची घोषणा केलेले भगीरथ भालके हे उद्यापासून मतदारसंघाचा दौरा करणार आहेत. जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून भालके हे मतदारसंघातील जनतेशी संवाद साधणार आहेत. याच दौऱ्यातून ते मतदारसंघाचा कोनासाही घेतील, त्यातूनच कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवायची, याचेही धोरण भालके ठरविण्याची शक्यता आहे.

Bhagirath Bhalke
Jayant Patil : जयंतराव जुनाच डाव टाकणार; विरोधकांमधील वजीर हेरून ‘राजा’ला चेकमेट देण्याची खेळी

भगीरथ भालके यांच्या जन आशीर्वाद यात्रेला हुन्नूर तालुक्यातील मंगळवेढा येथून सुरुवात होणार आहे. यात्रेच्या मुक्कामाच्या ठिकाणीच भगीरथ भालकेही राहणार आहेत. जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून मतदारसंघातील जनतेचा कल जाणून घेणार आहेत. महाविकास आघाडीने उमेदवार दिली नाही तरी भगीरथ भालके हे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत.

पंढरपूर मतदारसंघातून तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत, वसंतराव देशमुख, नागेश भोसले, हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक आहेत. याशिवाय विद्यमान आमदार समाधान आवताडे, प्रशांत परिचारक हे भाजपकडून इच्छूक आहेत.

Bhagirath Bhalke
Shiv Sena Leader's Prediction : ‘भाजपला विदर्भात केवळ 13-14 जागा मिळतील; फडणवीसांनाही निवडणूक सोपी नाही’

इतर इच्छुकांची संख्या ही वेगळीच आहे, त्यामुळे महायुतीकडून आवताडे यांना तिकिट मिळाले तर परिचारकांची भूमिका काय असणार, याची उत्सुकता आहे, त्याच प्रमाणे महाविकास आघाडीकडून विशेषतः तुतारीकडून कोणाला तिकिट मिळणार, याची प्रचंड उत्सुकता सोलापूर जिल्ह्यात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com