Devendra Fadnavis Sarkarnama
मराठवाडा

Baramati ByPoll : बारामतीतून काँग्रेसने माघार घेताच मुख्यमंत्री म्हणाले; ‘हर्षवर्धन सपकाळ सकाळीच सकारात्मक...’

Devendra Fadnavis on Congress's withdrawal from Baramati : बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी अर्ज माघार घेतल्याने बिनविरोध निवडीची शक्यता वाढली असून प्रमुख नेत्यांच्या सहमतीमुळे राजकीय एकजूट पाहायला मिळत आहे.

Vijaykumar Dudhale

Beed, 09 April : बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, आमदार रोहित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केलेल्या विनंतीनंतर काँग्रेसने आपला उमेदवार मागे घेतला आहे. त्यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाष्य केले आहे. मी सकाळीच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केला होता, त्या वेळी ते सकारात्मक होते, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बारामतीच्या पोटनिवडणुकीबाबत सूचक विधान केले आहे. ते म्हणाले, बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी मी सकाळीच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केला होता.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनामुळे होत असलेल्या पोटनिवडणुकीत आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) उभ्या आहेत. आपल्या महाराष्ट्राची परंपरा राहिली आहे की, एखाद्या नेत्याच्या निधनानंतर होणारी पोटनिवडणूक आपण बिनविरोध करतो. माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या मृत्यूनंतर भारतीय जनता पक्षाने त्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवार दिला नव्हता. त्याच अनुषंगाने आज मी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांना फोन करून विनंती केली, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले, सकाळी चर्चा करताना हर्षवर्धन सपकाळ हे मला सकारात्मक वाटले. पण, आता काय निर्णय झाला आहे, याबाबत मला अजून कल्पना नाही. कारण मी एका कार्यक्रमात होतो.

प्राजक्त तनपुरेंनी माझी विनंती मान्य केली, याचा आनंद

माजी आमदार प्राजक्त तनपुरे हे अतिशय चांगले नेते आहेत, त्यांचा मागील काळात परफॉर्मन्स चांगला राहिलेला आहे. त्यांना मी राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी अर्ज न भरण्याबाबत विनंती केली आणि त्यांनी ती मान्य केली. याचा मला अतिशय आनंद आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT