Rahuri by election : राहुरी पोटनिवडणुकीत मोठा ट्विस्ट; बिनविरोधची आशा मावळली ! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितले, 'होणारच...'

Shashikant Shinde News : राहुरीची पोटनिवडणूक होणारच असल्याचे त्यांनी सांगत या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार मोकाटे यांची उमेदवारी कायम राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Shashikant Shinde
Shashikant ShindeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : बारामती, राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा गुरुवारी शेवटचा दिवस आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याची चर्चा रंगली असतानाच आता या पोटनिवडणुकीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमाशी संवाद साधत असताना राहुरी येथील पॊटनिवडणुकीबाबत मोठे विधान केले आहे.

शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) म्हणाले,' बारामती पोटनिवडणुकीसाठी आमच्या पक्षाने न लढविण्याची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे आम्ही याठिकाणी उमेदवार दिलेला नाही. त्याशिवाय याठिकाणी काँग्रेसचा उमेदवार असला तरी आम्ही आमच्या निर्णयावर ठाम असल्याचे त्यांनी सांगितले. त्याशिवाय राहुरीची पोटनिवडणूक होणारच असल्याचे त्यांनी सांगत या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार गोविंदराव मोकाटे यांची उमेदवारी कायम राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Shashikant Shinde
Chandrakant Patil : "अशा परिस्थितीत भविष्यात काही मागायचे असते काही शब्द घ्यायचे असतात"; बारामतीच्या निवडणुकीवर चंद्रकांत पाटलांचं भाष्य

राहुरी पोटनिवडणुकीबाबत शशिकांत शिंदे यांनी सर्व संभ्रम दूर केला आहे. महाविकास आघाडीचे (MVA) उमेदवार म्हणून गोविंदराव मोकाटे यांची उमेदवारी कायम राहील, हे सांगून त्यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्ष आता कामाला लागले आहेत.

Shashikant Shinde
Rahuri Baramati By Election : राहुरी अन् बारामतीत काँग्रेसची रणनीती काय? वडेट्टीवार आक्रमक अन् वाढवली राजकीय उत्सुकता

दरम्यान, बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार घेण्याचे संकेत आज काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत. माघार घेण्याबाबत एकमत झाले असून दिल्लीत पक्षश्रेष्ठी अंतिम निर्णय घेतील, असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी मात्र अद्याप आपल्याला याबाबत निरोप नसल्याचे सांगितले आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे निर्णय सांगतील, असे त्यांनी सांगितले.

Shashikant Shinde
Baramati By-Election: काय होईल बारामतीत? महाराष्ट्रातील राजकीय आघाड्यांचे पोपट मेले आहेत...

दरम्यान, बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसने माघार घ्यावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. राष्ट्रवादीचे काही नेते हर्षवर्धन सपकाळ यांना भेटले असून माघार घेण्याची विनंती करण्यात आली आहे. या भेटीवेळी आमदार मकरंद पाटील, संजय खोडके, सना मलिक उपथित होते. त्यांनी बारामती पोटनिवडणुक बिनविरोध करण्याची मागणी केली आहे.

Shashikant Shinde
Baramati Rahuri bypoll: 'मविआ'च्या गोटात बारामती, राहुरी पोटनिवडणुकीसाठी हालचाली वाढल्या, ठाकरे-पवारांनी घातले लक्ष; उमेदवारीबाबत मोठा निर्णय होणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com