Kalyan Kale Sarkarnama
मराठवाडा

Congress Political News : काँग्रेसला जिल्ह्यात नऊ पैकी हव्यात सहा जागा ; आघाडीत ताणाताणी होणार..

There will be tension in Mahavikas Aghadi : एकीकडे शिवसेना सहा जागांवर, तर दुसरीकडे काँग्रेसनेही तितक्याच जागांवर दावा केल्याने ही कोंडी कशी फुटणार? हा खरा प्रश्न आहे. या शिवाय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष जिल्ह्यात किमान दोन मतदारसंघ आपल्याकडे घेण्याच्या प्रयत्नात आहे.

Jagdish Pansare

Chhatrapati Smabhajinagar Congress News : लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात तीन जागा जिंकत शंभर टक्के रिझल्ट देणाऱ्या काँग्रेसचा आत्मविश्वास बळावला आहे. या जोरावरच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विधानसभेच्या नऊ पैकी सहा मतदारसंघावर पक्षाने दावा सांगितला आहे. काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण नुकतेच संभाजीनगरात येऊन गेले. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील सर्व मतदारसंघाचा आढावा घेत काँग्रेसचे जालन्याचे खासदार डाॅ. कल्याण काळे यांच्याशी चर्चा केली.

यावेळी काळे यांनी आपण जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघ काँग्रेसकडे (Congress) घ्या, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केल्याचे सांगितले. काँग्रेस-राष्ट्रवादीची जेव्हा आघाडी होती, तेव्हा नऊ पैकी त्यांच्या वाट्याला चार मतदारसंघ यायचे. आता महाविकास आघाडीत काँग्रसने अतिरिक्त दोन मतदारसंघावर दावा सांगितल्याने जागा वाटपात ताणाताणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी जिल्ह्यात चाचपणी सुरू केली आहे. 2019 मध्ये झालेल्या विधासभा निवडणुकीत जिल्ह्यात महायुतीने सर्व जागा जिंकल्या होत्या. शिवसेनेत फूट पडल्यानंतर जिल्ह्यातील कन्नड विधानसभा मतदारसंघाचे एकमेव आमदार उदयसिंह राजपूत हे ठाकरे गटासोबत आहेत. तरी येणाऱ्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट जिल्ह्यातील पैठण, कन्नड, वैजापूर, गंगापूर, पश्चिम, मध्य या सहा मतदारसंघावर दावा सांगण्याची शक्यता आहे.

एकीकडे शिवसेना सहा जागांवर, तर दुसरीकडे काँग्रेसनेही तितक्याच जागांवर दावा केल्याने ही कोंडी कशी फुटणार? हा खरा प्रश्न आहे. (Chhatrapati Sambhajinagar) या शिवाय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष जिल्ह्यात किमान दोन मतदारसंघ आपल्याकडे घेण्याच्या प्रयत्नात आहे. अशावेळी जागा वाटपात महाविकास आघाडीमध्ये खटके उडू शकतात. खासदार कल्याण काळे हे खासदार असले तरी छत्रपती संभाजीनगर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्षही आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील जागा वाटपात त्यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे.

लातूर, नांदेड, जालना या तीन लोकसभा मतदारसंघात उमेदवार देत काँग्रेसने या जागा जिंकल्या होत्या. मराठवाड्यात शंभर टक्के रिझल्ट दिल्याचा दावा करत सर्वाधिक जागा आपल्या पदारात पाडून घेण्याचा काँग्रेस नेत्यांचा प्रयत्न आहे. अर्थात स्थानिक पातळीवर कितीही दावे केले जात असले तरी अंतिम जागा वाटप हे राज्यातील महाविकास आघाडीचे प्रमुख नेतेच करणार आहेत.

यावेळी अनेक मतदारसंघात अदलाबदल होण्याची देखील शक्यता आहे. तुर्तास लोकसभा निवडणुकीत 13 खासदार निवडून आल्यामुळे काँग्रेसची ताकद राज्यात वाढली आहे. राज्यातील महाविकास आघाडीत मोठ्या भावाच्या भूमिकेत शिरण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. तो कितपत यशस्वी होतो? हे विधानसभा निवडणुकीत या पक्षाला किती जागा मिळतात? यावर अवलंबून असणा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT