BJP Vs Mahavikas Aghadi : 'महाविकास आघाडी लवकरच फुटणार!'; भाजप नेत्याचा सर्वात मोठा दावा, ठाकरेंनाही टोला

Ashish Shelar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे दिल्लीला का गेले? असा प्रश्न महाराष्ट्र विचारतोय, त्यांच्या या दौऱ्यातून, राज्यातील, शेतकरी, विद्यार्थी आणि अतिवृष्टीबाधितांना काय मिळालं? असे अनेक प्रश्न उपस्थित करत आशिष शेलार यांनी पुन्हा एकदा ठाकरेंना डिवचलं आहे.
Mahavikas Aghadi
Mahavikas AghadiSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 10 August : राज्यातील महाविकास आघाडी लवकरच फुटणार आहे. जागावाटपात त्यांनी बनवाबनवी करुन ही फूट रोखली तरी मतदानानंतर निकाला दिवशीच आघाडी फुटणार असल्याचा मोठा दावा मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला आहे.

उद्धव ठाकरेंच्या (uddhav Thackerau) दिल्ली दौऱ्यावरुन भाजपने त्यांच्यावर टीका करण्याचा सिलसिला सुरुच ठेवला आहे. उद्धव ठाकरे दिल्लीला का गेले? असा प्रश्न महाराष्ट्र विचारतोय, त्यांच्या या दौऱ्यातून, राज्यातील, शेतकरी, विद्यार्थी आणि अतिवृष्टीबाधितांना काय मिळालं? असे अनेक प्रश्न उपस्थित करत आशिष शेलार यांनी पुन्हा एकदा ठाकरेंना डिवचलं आहे.

माध्यमांशी संवाद साधताना शेलार (Ashish Shelar) म्हणाले, "उद्धव ठाकरे हे स्वार्थासाठी दिल्लीला गेले आहेत. मुख्यमंत्रीपदासाठी ते तिथे गेलेत. मात्र, आमचा ठाकरेंना सवाल आहे की, तुम्हाला मुंबईचा वडापाव आवडतो की आता दिल्लीची नल्ली निहारी आवडू लागली आहे? मुंबई आणि महाराष्ट्राचं यांना काही देणेघेणं नाही, मी माझं कुटुंब माझी जबाबदारी इतकंच त्यांच्यासाठी सर्व आहे", अशा शब्दात त्यांनी हल्लाबोल केला.

Mahavikas Aghadi
Radhakrishna Vikhe : ठाकरेंचा दिल्ली दौरा आश्चर्यकारक; मंत्री विखेंनी मुख्यमंत्री पदाचं स्वप्न बघणाऱ्यांना देखील फटकारलं

तर महाविकास आघाडीमध्ये (MVA) विधानसभा निवडणुकीच्या प्रमुख चहऱ्यांवर वाद सुरु आहे. या संदर्भात बोलताना शेलार यांनी मोठा दावा केला. ते म्हणाले, "याबाबतीतही ठाकरेंना दिल्लीला जाऊन काही मिळालं नाही. मात्र माझा ठाम दावा आहे की, लवकरच महाविकास आघाडी फुटणार आहे. जागावाटपात त्यांनी बनवाबनवी करुन ही फुट रोखली तरी मतदानानंतर निकाला दिवशीच आघाडी फुटेल."

शिवाय इंडिया आघाडी आणि ठाकरे गटाकडून राज्यातील वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोपही त्यांनी केला. सलमान खुर्शीद यांच्यासारखे नेते वारंवार काहीतरी बोलत आहेत. त्यासाठी काही शहरी नक्षलवाद संघटना काम करत आहेत. काही दिवसांपासून विविध आंदोलन करत वेगळं चित्र निर्माण केलं जात आहे. राहुल आणि सोनिया गांधी विदेशात जाऊन देशातील संस्थांवर टीका करत आहेत.

Mahavikas Aghadi
Ajit Pawar News : मोदी अन् पवारसाहेबांबद्दलच्या 'त्या' वक्तव्यावर अजितदादांचा मोठा खुलासा; म्हणाले, 'हेच माझं दुर्दैव...!'

राज्यातील वातावरणही बिघडविण्याचा प्रयत्न सुरु आहे. राज ठाकरेंच्या ताफ्यावर सुपाऱ्या फेकणं हा त्याचाच भाग आहे. मात्र, अशी कामं केली तर त्याचा फटका उबाठा गटालाही बसेल. कोणत्याही नेत्याला अशा प्रकारे थांबवणं आम्हाला मान्य नाही. उद्या तुमच्या नेत्यांच्या ताफ्यासमोर लोक आले तर कोल्हेकुई करू नका, असा इशाराही त्यांनी ठाकरे गटाला दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com