DCM Devendra Fadanvis-Mla Abhimanyu Pawar News, Mumbai Sarkarnama
मराठवाडा

Abhimanyu Pawar : संततधार नुकसानभरपाई, रिक्त पदासंदर्भात उपमुख्यमंत्र्यांना साकडे

राज्यसेवा परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने घेण्याचा निर्णय २०२५ पासून लागू करण्याची विनंती केल्याचे पवार यांनी कळवले आहे. (Mla Abhimanyu Pawar)

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : राज्यात अतिवृष्टी, संततधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले. विशेषतः (Marathwada)मराठवाड्यात शेतकऱ्यांना याची मोठी झळ बसली आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून अनुदान मिळाले असले तरी संततधार पावसामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई अद्याप मिळालेली नाही. या व इतर मागण्यांसाठी औशाचे भाजप आमदार अभिमन्यू पवार (Abhimanyu Pawar) यांनी आज मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

या भेटीत पवार यांनी अनेक मागण्या केल्या, यात प्रामुख्याने राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये रिक्त असलेली पद, संततधार नुकसानभरपाई याचा समावेश होता. (Devendra Fadanvis) या भेटीत संततधार नुकसानभरपाईचे आदेश निर्गमित करण्याची, सर्व विभागांना रिक्त पदांचे मागणीपत्र आयोगाला तातडीने सादर करण्याच्या सूचना देण्याची व राज्यसेवा परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने घेण्याचा निर्णय २०२५ पासून लागू करण्याची विनंती केल्याचे पवार यांनी कळवले आहे.

फडणवीसांनी या सगळ्या मुद्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याचेही पवार यांनी सांगितले. राज्याच्या अनेक भागांमध्ये अतिवृष्टी, संततधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. या शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळावी, अशी मागणी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी सरकारकडे लावून धरली होती.

त्यानंतर अतिवृष्टी व लातूर, बीड, उस्मानाबाद या तीन जिल्ह्यात गोगलगायींच्या प्रादुर्भावामुळे नुकसान झालेल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने मदत दिली. परंतु संततधार पावसामुळे नुकसान झालेले शेतकरी अद्यापही मदतीपासून वंचित आहेत. हा मुद्दा प्रामुख्याने पवार यांनी फडणवीसांकडे मांडला. यावर लवकरच निर्णय अपेक्षित असल्याचे पवार यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT