Aurangabad : आमदार शिरसाट यांनी टेंडर भरू नको म्हणून बिल्डरला धमकावले ; गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप...

टेंडर भरू नका, अन्यथा तुम्हाला महागात पडले. तुम्हाला इथे काम करायचे आहे, शिरसाटांना भेटून घ्या, अन्यथा तुम्हाला ठार मारू, अशी धमकी दिली. (Aurangabad)
Mla Sanjay Shirsat-Ad. Gunratna Sadavarte News, Aurangabad
Mla Sanjay Shirsat-Ad. Gunratna Sadavarte News, AurangabadSarkarnama
Published on
Updated on

औरंगाबाद : पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील न्यायाधीशांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांचे टेंडर भरू नको, अन्यथा तुला ठार मारू, अशा प्रकारची धमकी दिल्याचा आरोप अॅड. गुणरत्न सदावर्ते (Ad. Gurnatna Sadavarte) यांनी पत्रकार परिषदेत केला.

बाबा कन्सट्रक्शन कंपनीच्या आपल्या अशिलाने या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या रजिस्टारांकेड यासंदर्भात लेखी तक्रार आणि धमकीचे रेकाॅर्डिंग सादर केले असून या संदर्भात न्यायालयात याचिका दाखल केली असल्याचे सांगितले. (Sanjay Shirsat) अॅड. गुणरत्न सदावर्ते, अॅड. जयश्री पाटील यांनी (Aurangabad) औरंगाबादेत पत्रकार परिषद घेतली.

कष्टकरी जनसंघच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सदावर्ते यांनी आमदार संजय शिरसाट यांच्यावर आरोप करत त्यांच्या चौकशीची मागणी केली आहे. सदावर्ते म्हणाले, औरंगाबादेतील स्नेहनगर भागात मुंबईच उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील न्यायाधिशांच्या निवासस्थानासाठी ४७ कोटी रुपये खर्चून दहा मजली इमारत बांधण्यात येत आहे.

या बांधकामासाठी टेंडर प्रक्रिया सुरू असतांनाच संजय शिरसाट यांनी आपल्या सहाय्यकामार्फत आमचे अशिल बाबा कन्स्ट्रक्शन अॅंन्ड इंजिनिअरिंग कंपनी यांना टेंडर भरू नका, अन्यथा तुम्हाला महागात पडले. तुम्हाला इथे काम करायचे आहे, शिरसाटांना भेटून घ्या, अन्यथा तुम्हाला ठार मारू, अशी धमकी दिली.

Mla Sanjay Shirsat-Ad. Gunratna Sadavarte News, Aurangabad
मोठी बातमी : PFI संघटनेवर पाच वर्षांची बंदी : अन्य आठ संघटनांवरही मोठी कारवाई

या संभाषणाचे रेकाॅर्डींग आमच्या अशिलाने मुंबई उच्च न्यायालयाच्या रजिस्टार यांच्याकडे लेखी तक्रार करत दिले आहे. त्यामुळे या प्रकरणात शिरसाट यांची चौकशी होऊन यातील तथ्य लवकरच समोर येईल, असा दावा देखील सदावर्ते यांनी केला. या संदर्भात आमदार संजय शिरसाट यांच्यांशी संपर्क साधला तेव्हा या विषयावर मी कुठलीच प्रतिक्रिया देणार नाही, असे त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com