Tujlapur Mandir Politics :  Sarkarnama
मराठवाडा

Tujlapur Mandir Politics : तुळजापुरात मंदिर विकास आराखड्याचा वाद पेटला; स्थानिकांकडून बंदची हाक

Tuljapur News : राज्यभरात अवघ्या आठवडाभरात नवरात्रोत्सव सुरू होईल.

अनुराधा धावडे

Tuljapur News : काही दिवसांपूर्वी तुळजाभवानी मंदिरातील देवीचे शिवकालीन दागिने गहाळ झाले होते. यावरून राजकारणही चांगलेच पेटले होते. हा वाद काहीसा शमला असतानाच आता तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्यावरून नवा वाद सुरू झाला आहे. दर्शन मंडपाच्या जागेवरून हा वाद सुरू झाला आहे. घाटशिळ येथे दर्शन मंडप उभारण्यास पुजारी, व्यापारी आणि स्थानिकांनी थेट विरोध दर्शविला आहे. इतकेच नव्हे तर हा विरोध दर्शवण्यासाठी उद्या (११ ऑक्टोबर) तुळजापूर बंदची हाक देण्यात आली आहे.

राज्यभरात अवघ्या आठवडाभरात नवरात्रोत्सव सुरू होईल. या नवरात्रोत्सवानिमित्त देश-विदेशातून भाविक देवीच्या दर्शनासाठी तुळजापूरला येत असतात. तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्यातील दर्शन मंडपाच्या जागेवरून सुरू झालेला वाद चिघळण्याची शक्यता आहे. घाटशीळ येथे दर्शन मंडप उभारल्यास स्थानिक व्यापाऱ्यांचे, छोट्या व्यावसायिकांचे नुकसान होईल, अशी भूमिका स्थानिकांनी घेतली आहे. (Maharashtra News)

तुळजाभवानी मंदिर संस्थानाचे विश्वस्त भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून मंदिर परिसराचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. उद्या सायंकाळी पाच वाजता तुळजाभवानी मंदिर संस्थान प्रशासकीय कार्यालयासमोर सादरीकरण केले जाईल. 15 ऑक्टोबरपर्यंत नागरिकांना सूचना आणि हरकती देता येतील. 16 व 17 ऑक्टोबरला त्यावर चर्चा होईल आणि 20 ऑक्टोबरपर्यंत नागरिकांच्या सूचनांवर तांत्रिक आणि प्रशासकीय विभागाकडून अभिप्राय घेतला जाईल. त्यानंतर 26 ऑक्टोबरपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांना अंतिम अहवाल सादर केला जाईल.

तुळजाभवानी मंदिरासाठी प्रसाद योजनेतून तब्बल एक हजार कोटींचा नवा आराखडा बनवला जात आहे. देवीचे दर्शन सुलभ व्हावे आणि भाविकांच्या वेळेची बचत व्हावी, यासाठीही काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे दर्शनासाठी भाविकांना वाट पाहावी लागणार नाही आणि आपला नंबर कधी असेल, हेही भक्तांना आधीच माहिती होईल. मंदिर परिसरात वाहन पार्किंगसाठी काउंटर पास दिले जातील. पासवर असलेल्या वेळेनुसार तासभर आधीच भाविकांना प्रवेश मिळेल.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT