Aurangabad Crime News
Aurangabad Crime News  sarkarnama
मराठवाडा

Crime news : महिलेवर वारंवार बलात्कार, नंतर गर्भपात; RPI नेत्याचं धक्कादायक कृत्य

सरकारनामा ब्युरो

Aurangabad Crime News : औरंगाबाद शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विवाहित महिलेवर वारवांर बलात्कार करुन तिचा गर्भपात करणाऱ्या रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) (Ramdas Athwale) युवक जिल्हाध्यक्षाला अटक करण्यात आली आहे. जयकिशन कांबळे असं आरपीआय (RIP) जिल्हाध्यक्षाचं नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांबळेने पीडित महिलेला तिच्या पतीपासून विभक्त केले. तिला लग्नाचे आणि घर देण्याचे अमिष दाखवले. एवढचं नाही तर तुझ्या मुलांनाही सांभाळेल, तुझ्याशी लग्न करेल, असे आमिष दाखवत राजनगर परिसरात रूमवर पिडित महिलेवर वारंवार बलात्कार केले. यातून महिला गरोदर राहिली असताना तिने कांबळेकडे लग्नासाठी तगादा लावला.

सुरूवातीला त्याने टाळाटाळ केली. पण पीडितेने सातत्याने लग्नाची मागणी केली असताना त्याने तिच्या पोटात वारंवार लाथा मारल्या. त्यामुळे तिचा गर्भपात झाला. धक्कादायक म्हणजे, तिने हे कोणाला सांगितले तर तुझ्या मुलांना ठाक मारेल, अशी धमकी सुद्धा दिली.

या सर्व घटनाक्रमानंतर पीडितेने पोलिसांत कांबळेविरोधात गुन्हा दाखल केला. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी जयकिशन कांबळेला अटक केली. तर न्यायालयाने त्यालापाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर या संपूर्ण प्रकारानंतर आरपीआयनेही त्याची पाच वर्षासाठी हकालपट्टी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT