Ambadas Danve On Bansode News Sarkarnama
मराठवाडा

Ambadas Danve On Bansode : शरद पवारांच्या `कृतज्ञता` सोहळ्यात दानवे कुणाला `कृतघ्न` म्हणाले...

Shivsena UBT : मंत्री बनसोडे यांनी आपल्या भाषणात शरद पवारांचे तोंडभरून कौतुक केले. राजकारणात तेच आपले आदर्श आहेत हेही सांगितले.

जलील पठाण.

Marathwada Political News : लातूर जिल्ह्यातील किल्लारीच्या भूकंपाला आज ३० वर्षे पूर्ण झाली. या महाभयंकर भूकंपाच्या आठवणीने अजूनही अंगावर शहारे येतात. या नैसर्गिक आपत्तीत ज्यांनी धीर दिला, पुन्हा उभे केले अशा तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज एका सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. (NCP News) या कृतज्ञता सोहळ्यात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यासपीठावर उपस्थितीत राज्याचे क्रीडा व युवक कल्याणमंत्री संजय बनसोडे यांना नाव न घेता टोला लगावला.

कृतज्ञता सोहळ्यात `काही लोक उपकार विसरून कृतघ्न होतात`, असा टोला त्यांनी लगावला. (Shivsena) आता हा टोला कुणाला होता हे समोर बसलेल्या लोकांना बरोबर कळले आणि त्यांनी दानवेंच्या विधानाला टाळ्या वाजवत प्रतिसाद दिला. राज्यात राष्ट्रवादीत बंड झाल्यानंतर पक्ष दोन गटांत विखुरला गेला. शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार अशा दोन गटांत अनेक नेते सध्या काम करत आहेत.

पक्षफुटीनंतर राज्यात शरद पवारांनी स्वाभिमानी सभा घेत अजित पवार गटावर हल्ला चढवला, तर त्याला उत्तरदायित्व सभांमधून दुसऱ्या गटाने प्रत्युत्तर दिले. (Latur) मंत्री संजय बनसोडे हे आज पहिल्यांदाच शरद पवार यांच्यासोबत एकाच व्यासपीठावर आले होते. किल्लारीच्या महाप्रलयंकारी भूकंपानंतर तेव्हाचे मुख्यमंत्री शरद पवार यांनी जे काम येथील भूकंपग्रस्तांसाठी केले ते कोणीही विसरू शकणार नाही.

आज त्या दुर्घटनेला तीस वर्षे पूर्ण झाली, त्यात दगावलेल्या लोकांप्रती सहवेदना तर आहेच. पण या संकटातून जे वाचले त्यांना नव्या उमेदीने उभे करण्याचे मोठे काम त्या काळी शरद पवारांनी केले. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी औसा येथे हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. मंत्री बनसोडे यांनी आपल्या भाषणात शरद पवारांचे तोंडभरून कौतुक केले. राजकारणात तेच आपले आदर्श आहेत हेही सांगितले.

पण त्यांच्यानंतर भाषण करताना अंबादास दानवे यांनी मात्र बनसोडे यांना राष्ट्रवादीचे बंड आणि त्यात अजित पवारांची साध दिल्याबद्दल नाव न घेता टोला लगावला. केलेल्या उपकाराची जाणीव ठेवणे म्हणजे कृतज्ञता. किल्लारीकरांना भूकंपाच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवारांनी केलेली मदत याची परतफेड म्हणून लोक त्यांचा कृतज्ञता सोहळा घेऊन करीत आहेत.

मात्र, एखाद्यावर कितीही उपकार केले तरी काही लोक कृतज्ञता दाखविण्यापेक्षा कृतघ्न होतात. काही लोकांना त्यांच्यावर केलेल्या उपकारांची जाणीव असते तर कांही लोकं कृतघ्न असतात त्यांच्यावर कितीही उपकार केले तरी ते विसरतात, असा चिमटाही दानवे यांनी या वेळी काढला. शरद पवारांवर एवढी निष्ठा असताना अजित पवारांची साथ का दिली ? असा सवालही दानवे यांनी केला. शरद पवारांच्या उपस्थितीत दानवेंनी टाकलेल्या या गुगलीने मंत्री बनसोडेंची अवस्था काहीशी बिकट झाली होती.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT