Uddhav Thackeray Visit Assembly House News Mumbai Sarkarnama
मराठवाडा

दानवे यांना विरोधी पक्षनेत्याच्या खुर्चीवर खूप दिवस बसू द्यायचे नाही ; ठाकरेंचे सूचक विधान..

उद्धव ठाकरे यांनी काल विधान भवनात प्रसार माध्यमांशी बोलतांना आपला न्याय व्यवस्थेवर विश्वास असल्याचे म्हटले होते. (Uddhav Thackeray)

सरकारनामा ब्युरो

मुंबई : अंबादास दानवे यांना विरोधी पक्षनेत्याच्या खुर्चीवर खूप दिवस बसू द्यायचे नाही, असे सूचक विधान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केल्याने राजकीय वर्तुळात तर्क वितर्काला उधाण आले आहे. (Shivsena) दानवे यांच्या कामाचे कौतुक करतानाच भविष्यातील राजकीय घडामोडीचे संकेत ठाकरे यांनी दिल्याचे मानले जाते.

राज्यातील सत्तांतर आणि मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर उद्धव ठाकरे काल पहिल्यादांच विधान भवनात आले. यावेळी आघाडीच्या नेत्यांनी त्यांचे स्वागत केले. (Maharashtra) महाविकास आघाडी भक्कम असल्याची ग्वाही देतांनाच त्यांनी विधान परिषेदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या संदर्भात एक वक्तव्य करत सूचक इशारा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

ठाकरे हे महाविकास आघाडीच्या बैठकीकरीता विधान भवनात आले होते. त्यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्यालयाला ठाकरे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी उपस्थित शिवसेना आमदारांनी उद्धव ठाकरे यांना दानवे यांच्या खुर्चीवर बसायची विनंती केली. त्याला त्यांनी नम्रपणे नकार दिला.

उद्धव ठाकरे म्हणाले, की मला दानवे यांना विरोधी पक्षनेत्याच्या खुर्चीवर खूप दिवस बसू द्यायचे नाही. ठाकरे यांच्या या वक्तव्याचे अनेक अर्थ काढले जात आहेत. शिवसेना विरुद्ध शिंदे गटाचा वाद सध्या सर्वोच्च न्यायलायात गेलेला आहे. दोन्ही बाजुंच्या याचिकांवर सुनावणी आणि निर्णय देण्यासाठी पाच न्यायाधीशांचे घटनापीठ स्थापन करण्यात आले आहे.

दोन्ही गट निकाल आपल्याच बाजूने लागणार असल्याचा दावा करत आहेत. उद्धव ठाकरे यांनी काल विधान भवनात प्रसार माध्यमांशी बोलतांना आपला न्याय व्यवस्थेवर विश्वास असल्याचे म्हटले होते.

न्याय देवतेच्या डोळ्यावर पट्टी असते ती समोर कोण आहे हे न पाहता योग्य न्याय करण्यासाठी असते, त्यामुळे आम्हाला न्याय मिळेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली होती. न्याय मिळेल या विश्वासामुळेच ठाकरे यांनी दानवे यांच्या विरोधी पक्षनेते पदाबद्दलचे वक्तव्य केले असावे, असेही बोलले जाते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT