Ajit Pawar : अजित दादांनी सांगितले, जे जे हॉस्पिटलमध्ये कुत्रे बसून होते...

मी जे जे हॉस्पिटलमध्ये त्या शेतकऱ्याला भेटायला गेलो, तेव्हा तेथे कुत्रे बसून होते, असे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) आज सभागृहात सांगितले.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama

नागपूर : काल सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) भाषण करीत असताना सुभाष भानुदास देशमुख या शेतकऱ्याने विधानभवनाच्या जवळच स्वतःला पेटवून घेतले. आज सकाळी ८.३० वाजता मी जे जे हॉस्पिटलमध्ये त्या शेतकऱ्याला भेटायला गेलो, तेव्हा तेथे कुत्रे बसून होते, असे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) आज सभागृहात सांगितले.

तेथे सुरक्षा रक्षक होते, पोलिसही होते. पण व्यवस्था कुठेच काही दिसली नाही. रुग्णांचे नातेवाईक जागा शोधून उभे होते. त्यांना बसायलाही कुठे जागा दिसत नव्हती. अशा हॉस्पिटलचे प्रशासन काय करते. असा प्रश्‍न तेथे गेल्यावर साहजिकच कुणालाही पडेल, असे अजित दादांनी सभागृहाला सांगितले. सुभाष देशमुख हा शेतकरी ४० टक्के जळाला आहे. त्याच्या प्रकृतीत अजूनही म्हणावा तसा सुधार नाही. त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर तैनात करायला हवे, असेही ते म्हणाले.

यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) म्हणाले, अशा हॉस्पिटलमध्ये तेथील स्थानिक आमदार सल्लागार समितीवर किंवा इतर कुठल्यातरी समितीमध्ये असतात. तेथील व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्याचे काम त्यांनी केले पाहिजे. कारण हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर रुग्णांना उपचार मिळणे जेवढे गरजेचे आहे. तेवढीच त्यांच्यासोबत आलेल्या कुटुंबियांनाही सुविधा मिळाल्या पाहिजे. राज्य सरकारचा संबंधित विभागही यापुढे या परिस्थितीवर लक्ष ठेवेल आणि रुग्णालय प्रशासनानेही योग्य व्यवस्था राखण्याची खबरदारी घ्यावी.

Ajit Pawar
Maharashtra Assembly Live पालघरच्या जिल्ह्याच्या आरोग्य प्रश्नांवरून अजित पवार संतापले

एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेव्हा सभागृहातून शेतकऱ्यांना आवाहन करीत होते, की या मराठी मातीचे तुम्ही मालक आहात, जगाकडे पाठ फिरवू नका, आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नका, आत्मघातात पराभव आणि संघर्षात लखलखीत यश असतं, असे मुख्यमंत्री सांगत होते, तेव्हाच सुभाष देशमुख या शेतकऱ्याने विधानभवनाच्या परिसरात स्वतःला पेटवून घेतले. ही घटना महाराष्ट्रासाठी येथे बसलेल्या आपल्या सर्वांसाठी दुर्दैवी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये, यासाठी सरकारने निश्‍चित धोरण आखले पाहिजे, असेही पवार यावेळी म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com