Minister Raosaheb Danve-Devendra Fadanvis News
Minister Raosaheb Danve-Devendra Fadanvis News Sarkarnama
मराठवाडा

Raosaheb Danve's Election Preparation: दानवे पिता-पुत्र लागले निवडणुकीच्या तयारीला, विकासकामांसाठी मुंबईत विशेष बैठक..

सरकारनामा ब्युरो

Jalna News: केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार संतोष दानवे (Santosh Danve) यांनी आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्रित होण्याचे संकेत रावसाहेब दानवे यांनी यापुर्वी आपल्या अनेक भाषणांमधून दिले होते. त्या दृष्टीने दानवे-पिता पुत्रांनी तयारी देखील सुरू केली असल्याचे चित्र आहे.

चौदा महिन्यांनी होणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टीने आपल्या लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघातील विकास कामांना गती देण्यासाठी रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या उपस्थितीतल अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. जिल्ह्यातील विकासकामांना तातडीने गती देण्याची सूचना दानवे यांनी करत कामांची जंत्रीच बैठकीत ठेवली.

या बैठकीत जालना जिल्ह्यातील अनेक विकासात्मक कामांचा आढावा घेतला. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थित सर्व अधिकाऱ्यांना सुरु असलेली कामे अधिक जलदगतीने करण्याचे निर्देशही दिले. यावेळी आमदार संतोष दानवे, नारायण कुचे, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधि व अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत अमृत २.० अंतर्गत न.प. जालनाची पाणीपुरवठा बळकटीकरण योजना, १५ मेगावॉटचा अंतर्गत सौरऊर्जा प्रकल्प मंजूर करणे, अंतर्गत विविध प्रमुख रस्त्यांचे सी. सी. बांधकाम करणेसाठी निधी मंजूर करणे, न.प. जालना जायकवाडी- जालना पाणीपुरवठा योजनेच्या देखभाल दुरुस्तीची थकीत देयके देण्यास निधी मंजूर करणे, महात्मा फुले मार्केट विकसित करणे, न.प. जालना अंतर्गत जालना शहरातील जवाहरबाग गार्डन विकसित करणे.

यासह जालना अंतर्गत लोखंडी पुलाचे दायित्वाची रक्कम मंजूर करणे, फुलंब्रीकर नाट्यगृह विकसित करणे, भोकरदन- जाफ्राबाद शहरातील विविध प्रमुख रस्त्यांचे सी. सी. बांधकाम करणेसाठी निधी मंजूर करणे, पाणीपुरवठा योजना मंजूर करणे, जालना जिल्ह्यासाठी वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करणे, जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातून वाहणाऱ्या पूर्णा नदीवरील ९ केटीवेअर चे बॅरेजेस मध्ये रुपांतर करणे व जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीवर नियुक्त करावयाच्या संचालक मंडळाबाबत निर्णय घेणे बाबत चर्चा करण्यात आली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT