Ambadas Danve On Eknath Shinde: आता झाले ना नऊ महिने, `वाचू का` विचारणाऱ्या मुख्यमंत्र्यांना टोला..

Shivsena : एकीकडे विरोधकांवर मनसोक्त फटकेबाजी आणि टोलेबाजी करणारे मुख्यमंत्री पत्रकार परिषदेतच का गडबडतात?
Ambadas Danve- CM Eknath Shinde News
Ambadas Danve- CM Eknath Shinde NewsSarkarnama
Published on: 
Updated on: 

Shivsena News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हजरजबाबी आणि प्रगल्भ झाल्यासारखे वाटत असले तरी अजूनही महत्वाचे निर्णय घेतांना किंवा पत्रकार परिषदेत सांगतांना जो आत्मविश्वास लागतो, तो त्यांच्यात नसल्याची टीका सातत्याने विरोधकांकडून केली जाते. शेजारी बसलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या परवानगीनेच ते बोलतात हे अनेकदा दिसून आले आहे.

Ambadas Danve- CM Eknath Shinde News
Jalgaon DudhSangh Fraud Case: राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ होणार; गिरीश महाजनांनी दिले 'हे' संकेत

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या समर्थनार्थ काढण्यात येणाऱ्या गौरव यात्रेची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी फडणवीसांना `वाचू का`, असे विचारले आणि पुन्हा एकदा त्यांच्यावर टीका होवू लागली आहे. (Eknath Shinde) विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी ट्विट करत `आता झाले ना ९ महिने! बालवाडीतील लेकरूसुद्धा बाराखडी बोलू लागते इतक्या दिवसात`, असा खोचक टोला लगावला आहे.

दानवे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता झाले ना ९ महिने! बालवाडीतील लेकरूसुद्धा बाराखडी बोलू लागते इतक्या दिवसात. कागद वाचायचा निर्णय घेण्यासाठी पण अजूनही 'सुपर सीएम'च लागतात का तुम्हाला? नुकताच मी राजस्थानात कठपुतलीचा खेळ पाहिला होता, आज मुंबईत पण असाच एक शो झाला म्हणे ! अशा शब्दात दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला.

राज्यातील सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात पहिल्यांदाच जे भाषण केले होते, त्यातील किस्से आणि गौप्यस्फोटांमुळे राज्यभरात धमाल उडाली होती. त्यानंतर झालेल्या नागपूर आणि आताच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील त्यांनी विरोधकांचा खास शैलीत घेतलेला समाचार राज्यात चर्चेचा विषय ठरला होता. एकीकडे विरोधकांवर मनसोक्त फटकेबाजी आणि टोलेबाजी करणारे मुख्यमंत्री पत्रकार परिषदेतच का गडबडतात? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थितीत केला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com