Raosaheb Danve-Sharad Pawar
Raosaheb Danve-Sharad Pawar Sarkarnama
मराठवाडा

Danve : युपीएच्या अध्यक्ष पदात रस नाही म्हणता, मग पक्षाच्या बैठकीत ठराव कसा ?

सरकारनामा ब्युरो

दिल्ली : नुकत्याच झालेल्या पाच राज्यातील निवडणुकांमध्ये पंजाब वगळता चार राज्यात काॅंग्रेससह इतर सर्व विरोधी पक्षांचा निक्काल लागला. (Bjp) गेली पन्नास-साठ वर्ष देशावर सर्वाधिक सत्ता भोगलेल्या काॅंग्रेस पक्षाची या पाचही राज्यांमध्ये दैनीय अवस्था झाली. या पराभवानंतर देशभरात भाजपविरोधी आघाडीचे वारे पुन्हा वाहू लागले आहे.

आगामी २०२४ च्या लोकसभा डोळ्यासमोर ठेवून देशपातळीवर संयुक्त पुरोगामी आघाडी उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काॅंग्रेसची कामगिरी प्रचंड खालावल्यामुळे येणाऱ्या काळात युपीएचे नेतृत्व शरद पवार (Sharad Pawar) यांनी स्वीकारावे, अशी मागणी होऊ लागली आहे. काॅंग्रेस मात्र राहूल गांधी, सोनिया गांधी यांनीच या आघाडीचे नेतृत्व करावे यावर ठाम आहे.

अशातच अध्यक्षपदासाठी ज्या शरद पवारांचे नाव चर्चेत आहे, त्यांनी मात्र आपल्याला युपीएचे अध्यक्षपद भूषवण्यात रस नसल्याचे स्पष्ट केले. यावर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांना दिल्लीत पत्रकारांनी प्रश्न विचारला, त्याला उत्तर देतांना कुठल्याही पक्षामध्ये एखाद्या विषयाचा ठराव घेतला जातो. त्याआधी त्यावर पक्षात चर्चा केली जाते, आणि मग तो सार्वजनिक केला जातो.

शरद पवार यांना विचारल्याशिवाय युपीएच्या अध्यक्षपदाचा ठराव राष्ट्रवादीच्या बैठकीत झाला असे शक्य आहे का? तर नाही? म्हणजेच हे ठरवून केलेले काम आहे. आता हा ठराव सार्वजनिक करून त्याची चर्चा जनतेमध्ये आणि देशभरातील राजकीय पक्षांमध्ये सुरू झाली आहे. यावर आता काय प्रतिक्रया उमटतात याकडे राष्ट्रवादी लक्ष ठेवून आहे. त्यानंतरच शरद पवारांकडून युपीएच्या अध्यक्षपदाबद्दल अधिकृतपणे बोलंल जाईल, असा दावा दानवे यांनी केला.

ईडीच्या कारवायांबद्दल विचारले असता, ईडी ही कुणामागेही लागू शकते, ती स्वायत्त संस्था आहे. याआधी सुरेश कलमाडी, अशोक चव्हाण, लालू प्रसाद यादव यांच्यावर देखील अशा प्रकारच्या कारवाया आणि चौकशा झाल्या आहेत. त्या आमच्या काळात झाल्या नव्हत्या. त्यामुळे ज्यांनी काही भानगडी केलेल्या नाही, त्यांना घाबरण्याचे काम नाही, असेही दानवे यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT