Raosaheb Danve See The kerala Story, News Sarkarnama
मराठवाडा

Raosaheb Danve Watched The Kerala Story: चारशे महिलांसोबत दानवेंनी पाहिला `द केरळा स्टोरी`, सेल्फीही दिल्या..

BJP News : गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील द केरळ स्टोरी चित्रपट पाहिला होता.

सरकारनामा ब्युरो

Jalna News: `द केरळा स्टोरी`, चित्रपटावरून (The kerala Story) सध्या देशभरात वादंग सुरू आहे. पश्चिम बंगाल, तामिळनाडूसह अन्य काही राज्यात या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. महाराष्ट्रात मात्र हा चित्रपट विविध राजकीय पक्षांकडून विशेषतः महिलांना मोफत दाखवण्यात येत आहे. जालन्यात महिलांसाठी या चित्रपटाच्या शोचे खास आयोजन करण्यात आले होते.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raoshaeb Danve) यांनी देखील चारशे महिलांसोबत जालन्यात हा चित्रपट पाहिला. (Jalna) चित्रपटगृहात त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी देखील मोठी गर्दी झाली होती. दानवे यांनी देखील आनंदाने महिलांना सेल्फी दिल्या. केरळ राज्यातील हिंदू मुलींच्या धर्मांतरावर आधारित हा चित्रपट प्रत्येक हिंदू महिला, मुलगी आणि नागरिकांनी पहावा, असे आवाहन दानवे यांनी यावेळी केले.

एकूण पंधराशे महिलांनी द केरळ स्टोरी चित्रपट पाहिल्याचे आयोजक (Bjp) भाजपचे पदाधिकारी तुलजेश चौधरी यांनी सांगितले. या चित्रपटाच्या शोचे आयोजन केल्याबद्दल दानवे यांनी चौधरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले. या चित्रपटावर विरोधकांकडून टीका होत असली तरी भाजप व इतर हिंदुत्ववादी पक्षांकडून द केरळा स्टोरी मोफत दाखवण्यात येत आहे.

चित्रपट पाहण्यासाठी येणाऱ्या महिलांना भगवे फेटे, उपरणे देवून त्यांचे स्वागत देखील केले जात आहे. विरोध आणि वादानंतरही या चित्रपटाने आतापर्यंत देशभरात दीडशे कोटींची कमाई केल्याचे सांगितले जाते. यापुर्वी राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील द केरळ स्टोरी चित्रपट पाहिला होता. त्यानंतर आता रावसाहेब दानवे यांनी देखील हा चित्रपट पाहिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT